कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वाईन शॉप चालकाने चक्क आपल्या वाईन शॉपच्या भिंतीवर प्रभू श्रीरामाचा बॅनर लावला होता. याप्रकरणी वाईन शॉप चालक राजन दुबे विरोधात कोळपेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
नक्की प्रकरण काय?
आज अयोध्या प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. देशभरात याची तयारी सुरू आहे. देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. लोक आपल्या परीने आजचा दिवस साजरा करण्यासाठी तयारी करत आहेत. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील ठिकठिकाणी बॅनरबाजी केली आहे. या सोबतच काही ठिकाणी दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिकांनी देखील बॅनर लावला आहे. मात्र एक बॅनर वादग्रस्त ठरला आहे. हा बॅनर चक्क एका वाईन शॉपच्या भिंतीवर हा बॅनर लावण्यात आला होता. कल्याण पूर्व येथील कल्याण शिळ रस्त्यावरील परिसरात आरडी वाईन शॉप आहे. या बॅनरवर प्रभू श्रीराम यांचा फोटो आणि अयोध्येतील मंदिराच्या फोटो होता. हा बॅनर बघितल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी ऋतू कांचन रसाळ यांनी या प्रकरणात कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
कोळसेवाडी पोलीस वाईन शॉपला दाखल झाले. हा बॅनर काढण्यात आला, परंतु तक्रारदार यांनी पोलिसांकडे मागणी केली हा बॅनर यांनी लावला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आधी पोलिसांनी टाळाटाळ केली. मात्र नंतर पोलिसांनी या प्रकरणात भा द वि 295(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पोलिसांनी वाईन शॉप चालक राजन दुबे यांना आरोपी केले आहे. परंतु याबाबत ऋतूकांचन रसाळ यांच्या म्हणणे आहे की वाईन शॉप चालक बॅनर लावून अनधिकृत बांधकाम करीत होता तो लपवण्यासाठी त्यांनी हा सर्व चुकीच्या प्रकार सर्व केला आहे. मात्र देवाचे नाव आणि फोटो एका वाईन शॉप वर लावणे चुकीचे होते म्हणून आम्ही या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वाईन शॉप चालकाविरोधात ठोस कारवाई केली पाहिजे असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे.