Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोखाड्यात रुग्णवाहिका आणि दुचाकीचा भीषण अपघात! दोघा तरुणांचा जागीच मृत्यू

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात निळमाती गावाजवळ गुरुवारी रात्री (२४ ऑक्टोबर २०२५) भरधाव शासकीय रुग्णवाहिकेने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अनिल खरपडे आणि चिंतामण किरकिरे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 25, 2025 | 05:13 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

दीपक गायकवाड, मोखाडा: जेव्हा रुग्णांची वाहक स्वतः रुग्ण तयार करते! अशाच काही प्रकार पालघर जिल्ह्यात झाला आहे. मोखाडा तालुक्यातील निळमाती गावाजवळ गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जव्हारकडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात जात असलेल्या शासकीय रुग्णवाहिका हिने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. शासकीय रुग्णवाहिकेचा गाडी क्रमांक MH-14 LX-1884 आहे तर दुचाकीचा गाडी क्रमांक MH-48 M-5715 आहे.

Third Mumbai Land Acquisition: तिसऱ्या मुंबईसाठी शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता MMRDAकडून भूसंपादन सुरू

दुचाकीवर अनिल सीताराम खरपडे आणि चिंतामण कृष्णा किरकिरे हे दोघे तरुण स्वार होते आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रुग्णवाहिका रमेश रामराव बर्डे चालवत होता. तो ४५ वर्षीय असून त्याला फार जखमा झाल्या आहेत. त्याला सध्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोखाडा पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात २४ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे आठ वाजून पंधरा मिनिटांनी घडला. रुग्णवाहिका चालकाने वेगाने आणि बेपर्वाईने वाहन चालवताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार ठोकर दिली. धडकेचा आवाज इतका प्रचंड होता की, आसपासचे लोक घटनास्थळी धावले, पण तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.

अपघातानंतर दुचाकी पूर्णपणे चक्काचूर झाली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून रुग्णवाहिका चालक रमेश बर्डे याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यू घडवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांनी सांगितले की, जखमी चालकावर सध्या उपचार सुरू असून, उपचारानंतर त्याला ताब्यात घेण्यात येईल.

साहिल कन्स्ट्रक्शने मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधवांची दिवाळी केली गोड

या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

Web Title: A horrific accident involving an ambulance and a bike in mokhada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 05:13 PM

Topics:  

  • palghar

संबंधित बातम्या

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
1

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू
2

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू

Palghar PWD Scam : पीडब्ल्यूडीत 73 लाखांचा घोटाळा, बनावट दस्तऐवज तयार; ‘अभिप्राया’च्या नावाखाली FRI रोखला
3

Palghar PWD Scam : पीडब्ल्यूडीत 73 लाखांचा घोटाळा, बनावट दस्तऐवज तयार; ‘अभिप्राया’च्या नावाखाली FRI रोखला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.