फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: दिवाळीच्या सणाचे औचित्य साधत साहिल कन्स्ट्रक्शन मोखाडा आणि भाजपचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी मोखाडा तालुक्यात विविध ठिकाणी आदिवासी बांधवांची दिवाळी गोड करण्यात येते.यावर्षीही तालुक्यातील मौजे घोडिपाडा, धारेचापाडा, चारणवाडी परिसरातील विविध आदिवासी पाड्यांसह तालुक्यात बहूतांश ठिकाणी दीपावली फराळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या उपक्रमांतर्गत मोखाडा तालुक्यातील सुमारे १५०० आदिवासी बांधवांना फराळाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.थेट दुर्गम भागातील बांधवांपर्यंत पोहोचून त्यांच्यासोबत सणाचा आनंद साजरा करण्याचा आनंद काही औरच असतो.त्यामूळेच अशा अद्वितीय संकल्पाने चोथे कुटूंबीय दीपोत्सव साजरा करत असतात. “आदिवासी बांधव हे आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवणे हीच आमच्यासाठी खरी दिवाळी आहे.”असे विनत प्रतिपादन यावेळी चोथे यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहिल कन्स्ट्रक्शन टीम, स्थानिक भाजपा कार्यकर्ते, तसेच गावकऱ्यांनी मोठा उत्साह दाखवत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. समाजसेवेच्या भावनेतून करण्यात आलेला हा उपक्रम आदिवासी पाड्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करणारा ठरला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र पाटील, दिलीप गाटे नगरपंचायत गटनेता प्रमोद कोठेकर, नगरपंचायत सभापती प्रतीक पागारे, विठ्ठल पाटील,अशोक मोकाशी , युवा मोर्चा जिल्हा सचिव दिशांत पाटील, सरपंच प्रकाश भोंडवे, शहराध्यक्ष गणेश पाटील ऋषिकेश लाडे , वैभव पाटील, राजेंद्र पाटील, ओंकार पाटील, हरिश्चंद्र जाधव, किशोर भवारी, अलका बुधर , शितल घाणे, सौरभ खरोटे, मनोज पाटील, किशोर पाटील, जावेद फकीर, विष्णू दिघा, राजू माळी, दिगंबर पाटील, इतर पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.






