Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याणच्या पत्रीपुलाजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी!

एमएसआरडीसी मार्फत कल्याण शहरातील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे बहुतांश काम झालेले असून ज्या भागातील रस्त्याची कामे अपुर्ण आहेत ती हाती घेण्यात आलेली आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 04, 2024 | 11:08 AM
कल्याणच्या पत्रीपुलाजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी!
Follow Us
Follow Us:

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातून जाणारा कल्याण शिळ रस्ता हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अनाधिकृत आहे. सदर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम एमएसआरडीसी मार्फत सुरू असून यातील कल्याण येथील पत्रीपुलाला जोडणाऱ्या पोहोच रस्त्यांचे काम नुकतेच एमएसआरडीसीने सुरु केले आहे. सदर कामामुळे या ठिकाणी मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्याबाबत तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्याने याबाबतीत सर्व संबंधितांसोबत संयुक्त पाहणी करून उपाययोजना करण्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज या सदर ठिकाणी महापालिका, एमएसआरडीसी व शहर वाहतूक शाखा अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली.

एमएसआरडीसी मार्फत कल्याण शहरातील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे बहुतांश काम झालेले असून ज्या भागातील रस्त्याची कामे अपुर्ण आहेत ती हाती घेण्यात आलेली आहेत. पत्रीपुलाच्या उतारावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याने पावसाळयापुर्वी पुढील एक ते दीड महिन्याच्या कालावधीत काँक्रिटीकरण करण्याचे नियोजन असल्याची माहिती यावेळी एमएसआरडीसी कडून देण्यात आली. तसेच येथील प्रचंड रहदारीमुळे फक्त रात्री 12.00 ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत काम करण्यास अनुमती असल्याने कामाचा वेग ठेवण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पाहणी दरम्यान झालेल्या चर्चेनुसार या ठिकाणी एकूण चार मार्गांचे काम असून पहिला मार्ग अंतिम टप्प्यात आहे. तसेच उरलेल्या तीन मार्गांची कामे 30 एप्रिल पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अभियंता व ठेकेदार यांना देण्यात आल्या. त्याचबरोबर कामाचा वेग तातडीने वाढविणे, कामासाठी रात्री 10.00 ते सकाळी 8.00 वाजेपर्यंत एमएसआरडीसीला अनुमती देणे व वाहतुक कोंडीचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने वाढीव 15 ते 20 ट्रॅफिक वॉर्डन शहर वाहतूक शाखेत उपलब्ध करण्याबाबत सूचना महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी संबंधिताना दिल्या.

सदर ठिकाणी असलेल्या खड्डयांमुळे वाहतुकीस होणारा त्रास कायमस्वरूपी दूर करण्याच्या दृष्टीने हे काम होणे आवश्यक असल्याने त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. अशा आशयाच्या आवाहनाचे सुचना फलक लावण्याच्या सूचना महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी एमएसआरडीचे कार्यकारी अभियंता यांना दिल्या. सदर पाहणी दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता अनिरुध्द बोर्डे, शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक शिरसाट व त्यांचे प्रतिनिधी तसेच साकेत इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर गुरमे इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

Web Title: A joint inspection of the authorities to take measures on the traffic jam near patripula of kalyan thane kalyan dombivli municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2024 | 11:08 AM

Topics:  

  • Kalyan Dombivli Municipal Corporation
  • Maharashtra Government
  • thane

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
2

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु
3

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती
4

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.