Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘या’ मंत्र्याने दिला वर्षभराचा पगार; जाणून घ्या रक्कम किती?

राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्रिपदाचे वर्षभराचे वेतन रक्कम रुपये 31 लक्ष 18 हजार 286 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत दिले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 07, 2025 | 05:10 PM
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 'या' मंत्र्याने दिला वर्षभराचा पगार; जाणून घ्या रक्कम किती?

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 'या' मंत्र्याने दिला वर्षभराचा पगार; जाणून घ्या रक्कम किती?

Follow Us
Close
Follow Us:
  • पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
  • पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी गिरीश महाजनांनी दिला वर्षभराचा पगार
  • शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज

मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी आणि वादळामुळे मराठवाड्यासह विविध भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला असून बळीराजावर संकट कोसळलं आहे. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. अशातच आता शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी महायुतीच्या सर्वच आमदार-खासदारांनी आपला एक महिन्याचा पगार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देऊ केला आहे. मात्र, राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्रिपदाचे वर्षभराचे वेतन रक्कम रुपये 31 लक्ष 18 हजार 286 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत दिले आहेत.

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांना भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. मराठवाड्यातील जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव नाशिक, या जिल्ह्यांमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी भेटी घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. गिरीश महाजन हे आपला वर्षभराचा पगार देणारे राज्यातील पहिलेच मंत्री ठरले आहेत. मंत्री पदाची शपथ घेतल्यापासून डिंसेबर 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीचे संपूर्ण वेतन रु. ३१ लक्ष १८ हजार २८६ त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले आहे आहेत.

सरकारकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर

राज्यातील अतिवृ्ष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा लागली असून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे आजच शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा होणार असल्याची माहिती होती, दिवाळीपूर्वीच बळीराजाच्या खात्यावर मदतनिधी जमा होईल, असेही मुख्यमंत्र्‍यांनी यापूर्वी सांगितले होते. दिवाळी सणाला अवघे काही दिवस राहिल्याने आता राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी अखेर मदतीचं पॅकेज जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी मदत पॅकेजची घोषणा केली. त्यानुसार, ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेली, त्यांना हेक्टरी 3.47 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच, अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. शेतकरी, नुकसानग्रस्त घरे, जमिनी आणि जनावरांच्या नुकसानीसाठीही भरीव मदत देण्याचा शासनाचा निर्णय आहे.

काही राहून गेलं तर समावेश करू – अजित पवार

दोन हेक्टरपर्यंत एनडीआरएफ आणि केंद्राचे नॉर्म्स असतात, त्यावरील भार आम्ही उचलला आहे. बारकाईने विचार करत कोणताही घटक वंचित राहणार नाही असा विचार केलाय. भौगोलिक परिस्थिती वेगळी असते, जर काही राहून गेलं तर त्याचा समावेश करण्याची देखील आमची तयारी आहे, अशी माहिती यावेळी उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Web Title: A minister has donated a years salary to flood affected farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2025 | 05:10 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • girish mahajan

संबंधित बातम्या

अक्षय कुमारचा अनोखा प्रश्न आणि फडणवीसांचं हटके उत्तर; संत्र्यावरून रंगली चर्चा!
1

अक्षय कुमारचा अनोखा प्रश्न आणि फडणवीसांचं हटके उत्तर; संत्र्यावरून रंगली चर्चा!

Flood Relief: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला! शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; तब्बल ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर
2

Flood Relief: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला! शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; तब्बल ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! किसान सन्मान निधीचे २००० रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का? असं करा चेक
3

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! किसान सन्मान निधीचे २००० रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का? असं करा चेक

PCMC Elections 2025 : अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता; वाचा ‘हे’ 3 महत्त्वाचे बदल
4

PCMC Elections 2025 : अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता; वाचा ‘हे’ 3 महत्त्वाचे बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.