Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

…तर सह्याद्री राज्यात विक्रम प्रस्थापित करेल; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा विश्वास

सहकाराची ताकद ही एकजुटीत आहे. सभासदांनी साथ दिली तर सह्याद्री राज्यात नवा विक्रम प्रस्थापित करेल, असा विश्वास माजी सहकार मंत्री व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी बोलताना व्यक्त केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 03, 2026 | 12:17 PM
...तर सह्याद्री राज्यात विक्रम प्रस्थापित करेल; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा विश्वास

...तर सह्याद्री राज्यात विक्रम प्रस्थापित करेल; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा विश्वास

Follow Us
Follow Us:

मसूर : सहकाराची ताकद ही एकजुटीत आहे. सभासदांनी साथ दिली तर सह्याद्री राज्यात नवा विक्रम प्रस्थापित करेल, असा विश्वास माजी सहकार मंत्री व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी बोलताना व्यक्त केला. यशवंतनगर (ता. कराड) येथे सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या ५२ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ कारखान्याचे संचालक संभाजी शंकर साळवे व त्यांच्या पत्नी जयश्री संभाजी साळवे यांच्या हस्ते करण्यात आला. व्हॉइस सह्याद्रीचे चेअरमन कांतीलाल पाटील व आजी-माजी संचालक उपस्थित होते.

 

माजी मंत्री पाटील म्हणाले, सह्याद्रीने नेहमीच शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले. मागील महिन्यात सुरू झालेल्या विस्तार प्रकल्पामुळे गाळप क्षमता लक्षणीय वाढणार आहे. त्यामुळे ऊस वेळेवर जात नाही ही शेतकऱ्यांची अनेक वर्षांची तक्रार आता इतिहासजमा होईल. ऊस तोड, वाहतूक, गाळप या संपूर्ण साखळीत गती येणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. सभासद शेतकऱ्यांनी आपला ऊस सह्याद्रीलाच देऊन कारखान्याशी नाळ अधिक घट्ट करावी. आगामी गळीत हंगाम विक्रमी करण्याचा संकल्प ठरला आहे. हणबरवाडी-धनगरवाडी योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली, या योजनेचे श्रेय घेण्यासाठी काहीजण राजकीय प्रयत्न करत असले तरी शेतकऱ्यांनी अशा दाव्यांकडे दुर्लक्ष करावे. या योजनेचे आम्हाला सातत्याने हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे ही मागणी राहील.

हे सुद्धा वाचा : जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, साहित्य अन् समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया

तोडणी मुकादम, वाहतूक कंत्राटदार, बैलगाडीवान, ट्रॅक्टरमालक, ऊस तोडणी मशीन मालक यांना सह्याद्रि साखर कारखाना व ऊस तोडणी वाहतूक संस्थच्या वतीने रोख रक्कम, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यकारी संचालक विश्वजीत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कांतीलाल पाटील यांनी आभार मानले. समारंभास संचालक मंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

इथेनॉल निर्मिती हा सह्याद्रीचा नवा आर्थिक कणा असून, ऊस साखळीला अधिक मूल्य मिळवून देण्यासाठी सह्याद्रीने इथेनॉल क्षेत्रातही मोठी झेप घेतली आहे. यंदा कारखान्यात १ कोटी १२ लाख लिटर इथेनॉल निर्मिती झाली असून, शासनाबरोबर २ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याचा करार करण्यात आला आहे. भविष्यात इथेनॉलमधून कारखान्याला कोट्यवधींचा अतिरिक्त महसूल मिळेल. त्याचा थेट फायदा सभासद शेतकऱ्यांना होईल. – बाळासाहेब पाटील

Web Title: Former minister balasaheb patil has expressed great confidence in the sahyadri sugar factory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • balasaheb patil
  • Farmers
  • Sugar Factory

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: दुष्काळाचा आणखी एक बळी! 34 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात
1

Maharashtra Drought 2026: दुष्काळाचा आणखी एक बळी! 34 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

Pune : पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेती कर्जवसुलीला स्थगिती
2

Pune : पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेती कर्जवसुलीला स्थगिती

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे
3

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे

Dharashiv News: दुष्काळात शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीचा तगादा नको; धाराशिव जिल्हा काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
4

Dharashiv News: दुष्काळात शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीचा तगादा नको; धाराशिव जिल्हा काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.