Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार महिन्यांपूर्वीच झाला विवाह, अंगावर झाड कोसळले अन् झालं होत्याचं नव्हतं; नवदाम्पत्य जागीच ठार

पुरंदर तालुक्यातील सासवड-वीर रस्त्यावर शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी रस्त्याच्या कडेला असलेले वडाचे झाड अंगावर कोसळल्याने परिंचे येथील नवविवाहित जोडप्यासह एका सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.  

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 23, 2022 | 04:46 PM
चार महिन्यांपूर्वीच झाला विवाह, अंगावर झाड कोसळले अन् झालं होत्याचं नव्हतं; नवदाम्पत्य जागीच ठार
Follow Us
Follow Us:

सासवड : पुरंदर तालुक्यातील सासवड-वीर रस्त्यावर शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी रस्त्याच्या कडेला असलेले वडाचे झाड अंगावर कोसळल्याने परिंचे येथील नवविवाहित जोडप्यासह एका सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.

रेनुकेश गुणशेखर जाधव (वय २९), सारिका रेनुकेश जाधव (वय २३) अशी मृत्यू झालेल्या जोडप्याची व ईश्वरी संदेश देशमुख, असे मुलीचे नाव आहे. हे तिघेही शुक्रवारी सायंकाळी सासवडहून परिंचेकडे दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. रस्त्याशेजारील अर्धवट जळलेले वडाचे झाड जाधव यांच्या अंगावर कोसळले. यामध्ये रेनुकेश व सारिका यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची भाची गंभीर जखमी झाली.

पोलिसांनी  तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना सासवड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. तर मुलगी बेशुध्द अवस्थेत असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले. उपचारादरम्यान तिचाही रात्री उशिरा मृत्यू झाला.

रेनुकेश जाधव हा पिरींचे येथील पत्रकार गुणशेखर जाधव यांचा एकुलता एक मुलगा होता. रेनुकेश आणि सारिका यांचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पुरंदरला अवकाळी पावसाने झोडपले

शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पुरंदर तालुक्याला झोडपले. त्यामुळे अनेक भागात मोठी झाडे उन्मळून पडली. तसेच आंब्याच्या झाडांचे नुकसान झाले. विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. सुमारे दोन तास पावसाने हजेरी लावली. परिणामी, सखल भागात पाणी साठले होते. सुमारे २०.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे आचार्य अत्रे वेधशाळेचे नितीन यादव यांनी सांगितले.

Web Title: A newly wed couples killed after tree collapsed on their body in saswad pune nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2022 | 04:46 PM

Topics:  

  • Saswad
  • Tree Collapsed

संबंधित बातम्या

Mumbai News: रस्त्यांवरील झाडांचा गुदमरतोय श्वास! मुंबईत ‘डी-काँक्रिटीकरण’ करा, वॉचडॉग फाउंडेशनची मागणी
1

Mumbai News: रस्त्यांवरील झाडांचा गुदमरतोय श्वास! मुंबईत ‘डी-काँक्रिटीकरण’ करा, वॉचडॉग फाउंडेशनची मागणी

Actor Car Accident:  मुसळधार पावसात अभिनेत्याच्या BMW कारवर कोसळलं झाड, कारचा चक्काचूर; थोडक्यात वाचला जीव!
2

Actor Car Accident: मुसळधार पावसात अभिनेत्याच्या BMW कारवर कोसळलं झाड, कारचा चक्काचूर; थोडक्यात वाचला जीव!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.