Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: रस्त्यांवरील झाडांचा गुदमरतोय श्वास! मुंबईत ‘डी-काँक्रिटीकरण’ करा, वॉचडॉग फाउंडेशनची मागणी

'वॉचडॉग फाउंडेशन'चे गॉडफ्रे पिमेंटा यांनी ३ जुलै २०२६ रोजी गोखले रोडवरील पदपथांची पाहणी केली असता, अनेक झाडांच्या बुंध्याभोवती थोडीही जागा न सोडता थेट काँक्रिटआणि पेव्हर ब्लॉक्स बसवण्यात आल्याचे दिसून आले. झाडांच्या मुळांना हवा मिळण्यासाठी आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी पुरेशी मोकळी मातीच शिल्लक ठेवलेली नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 05, 2026 | 10:28 AM
रस्त्यांवरील झाडांचा गुदमरतोय श्वास! मुंबईत 'डी-काँक्रिटीकरण' करा, वॉचडॉग फाउंडेशनची मागणी

रस्त्यांवरील झाडांचा गुदमरतोय श्वास! मुंबईत 'डी-काँक्रिटीकरण' करा, वॉचडॉग फाउंडेशनची मागणी

Follow Us
Follow Us:

मुंबईतील रस्त्यांच्या कडेला आणि पदपथांवर असलेल्या झाडांच्या सभोवताली मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणामुळे झाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दादर (पश्चिम) येथील गोखले रोडवरील अनेक जुनी आणि मोठी झाडे काँक्रिट आणि पेव्हर ब्लॉकच्या विळख्यात पूर्णपणे अडकल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या गंभीर समस्येकडे वॉचडॉग फाउंडेशन संस्थेने लक्ष वेधत मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून संपूर्ण मुंबईत तातडीने ‘डी-काँक्रिटीकरण’ मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.(फोटो सौजन्य – AI)

मुंबईकरांच्या जीवनात ‘एआय वैद्य’ची स्मार्ट एंट्री! प्रायोगिक तत्त्वावर प्रणाली सुरू करण्याचा निर्णय; डॉक्टरांच्या आधी घेणार माहिती

‘वॉचडॉग फाउंडेशन’चे गॉडफ्रे पिमेंटा यांनी ३ जुलै २०२६ रोजी गोखले रोडवरील पदपथांची पाहणी केली असता, अनेक झाडांच्या बुंध्याभोवती थोडीही जागा न सोडता थेट काँक्रिटआणि पेव्हर ब्लॉक्स बसवण्यात आल्याचे दिसून आले. झाडांच्या मुळांना हवा मिळण्यासाठी आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी पुरेशी मोकळी मातीच शिल्लक ठेवलेली नाही. यामुळे झाडे हळूहळू कमकुवत होऊन वाळत असून, मुंबईत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष पडण्यामागच्या घटनांमागे हे अति-काँक्रिटीकरण आणि झाडांची योग्य काळजी न घेणे हेच मुख्य कारण असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

राष्ट्रीय हरित लवादने २०१३ मध्ये दिलेल्या आदेशांचे उघड उल्लंघन आहे. लवादाने कोणत्याही झाडाच्या बुंध्याभोवती किमान १ मीटर (३ फूट) अंतरापर्यंत कॉक्रिटीकरण करण्यास सक्त मनाई केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही ‘कलम २१’ नुसार पर्यावरण संरक्षण हा नागरिकांच्या जगण्याच्या अधिकाराचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, मुंबईत कंत्राटदार आणि पालिकेच्या अभियंत्यांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले आहे.

Maharashtra Monsoon Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी

या पार्श्वभूमीवर, पालिकेने संपूर्ण मुंबईतील रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांची तात्काळ संयुक्त पाहणी करावी, अशी मागणी पिमेंटा यांनी केली आहे. प्रत्येक झाडाच्या बुंध्याभोवतीचे किमान १ मीटर अंतरावरील काँक्रिट काढून तिथे मोकळी माती व खत टाकावे, जेणेकरून पाणी जमिनीत मुरेल. तसेच रस्ते आणि पदपथांचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना झाडांभोवती जागा सोडण्याचे कडक नियम लागू करावेत, केवळ रस्तेच नव्हे, तर अनेक गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातही मोठ्या प्रमाणावर कॉक्रिटीकरण झाले असल्याने तिथेही ‘ट्री ऑडिट’ करून डी-कॉक्रिटीकरण मोहीम हाती घ्यावी, असेही पत्रात नमूद केले आहे. मुंबईतील जुनी झाडे हे शहराचे वैभव आणि फुफ्फुसे आहेत, विकासकामांच्या नावाखाली त्यांचा असा गळा घोटणे म्हणजे पर्यावरणाची मोठी हानी आहे, असे मत पिमेंटा यांनी व्यक्त केले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai trees are struggling to breathe watchdog foundation demands roadside tree deconcretisation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • Monsoon Alert
  • Mumbai News
  • Tree Collapsed

संबंधित बातम्या

Mumbai News : ‘NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घ्या’; मुंबई युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस सहआयुक्तांकडे मागणी
1

Mumbai News : ‘NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घ्या’; मुंबई युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस सहआयुक्तांकडे मागणी

बिल्डरच्या चुकीचा फटका बसलेल्या लाखो मुंबईकरांना दिलासा; २५ हजार इमारतींना मिळणार ओसी
2

बिल्डरच्या चुकीचा फटका बसलेल्या लाखो मुंबईकरांना दिलासा; २५ हजार इमारतींना मिळणार ओसी

FDA Action On Hotels:तुकाराम मुंढे जोमात हॉटेल मालक कोमात! FDAच्या कारवाईत मुंबईसह राज्यातील मोठ्या रेस्टॉरंट्सचे परवाने रद्द
3

FDA Action On Hotels:तुकाराम मुंढे जोमात हॉटेल मालक कोमात! FDAच्या कारवाईत मुंबईसह राज्यातील मोठ्या रेस्टॉरंट्सचे परवाने रद्द

कचरागाड्यांचा त्रास आटोक्यात आणा! उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश; कांजूर कचराभूमीबाबत सुनावणी
4

कचरागाड्यांचा त्रास आटोक्यात आणा! उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश; कांजूर कचराभूमीबाबत सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.