Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Actor Car Accident: मुसळधार पावसात अभिनेत्याच्या BMW कारवर कोसळलं झाड, कारचा चक्काचूर; थोडक्यात वाचला जीव!

Heavy Rain News: मुंबईतील मुसळधार पावसात उर्वशी ढोलकियाचा मुलगा क्षितिज ढोलकियाच्या BMW कारवर झाड कोसळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने तो सुरक्षित असून मोठी दुर्घटना टळली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 05, 2026 | 08:55 AM
( फोटो सौजन्य -सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य -सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Heavy Rain News: महाराष्ट्रात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले असून नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरत आहे. तसेच, अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटनाही समोर येत आहेत. या मुसळधार पावसाचा फटका आता सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींनाही बसू लागला आहे.

अभिनेत्री उर्वशी ढोलकियाचा मुलगा क्षितिज ढोलकिया एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला. त्याच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी असलेल्या त्याच्या BMW कारवर अचानक मोठे झाड कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने, ही घटना घडली तेव्हा क्षितिज किंवा इतर कोणीही गाडीत नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

या घटनेनंतर क्षितिजने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये झाडाखाली दबलेली आणि चक्काचूर झालेली कार तसेच अग्निशमन दलाचे कर्मचारी झाड हटवताना दिसत आहेत. त्याने मुंबई पोलिसांचे आणि बचाव पथकाचे आभार मानत, आपण सुरक्षित असल्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजत असल्याची भावना व्यक्त केली.

 

KGF Star Yash : ‘आई-वडिलांसोबत पाहू शकत नाही असा रोमँटिक सीन…’, ‘टॉक्सिक’ वादात KGF स्टार यशचा जुना व्हिडिओ व्हायरल

क्षितिज ढोलकियाने अभिनय क्षेत्रात ‘नागिन ७’ मालिकेतून पदार्पण केले. अभिनयापूर्वी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले असून ‘हमशकल’ आणि ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटांच्या निर्मिती टीममध्ये तो सहभागी होता. त्याची आई उर्वशी ढोलकिया ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतील ‘कोमोलिका’ या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाली. तसेच ती ‘बिग बॉस ६’ ची विजेतीही राहिली आहे.

( फोटो सौजन्य -सोशल मिडिया)

Abhijeet Khandkekar : ‘पण अभिजीत माझा…’ नवऱ्यासाठी सुखदा खांडकेकरची खास पोस्ट! शेअर करण्यामागे काही तरी खास कारण

दरम्यान, मुंबईतील मुसळधार पावसामुळे अनेक सेलिब्रिटींनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशनूर कौर हिच्या आलिशान घरात पावसाचे पाणी शिरल्याने तिच्या घरातील वस्तूंचे नुकसान झाले. तर वाहतूक कोंडीमुळे अभिनेता रणदीप हुडा याला सामान्य प्रवाशांप्रमाणे मेट्रोने प्रवास करावा लागला. मुंबईतील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.

Web Title: During heavy rainfall in mumbai a tree fell on urvashi dholakias son kshitij dholakias bmw car causing extensive damage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • BMW
  • Mumbai Rain
  • Tree Collapsed

संबंधित बातम्या

BMW New Luxury Cars: कारप्रेमींची प्रतीक्षा संपली! नवी BMW 7 Series अन् इलेक्ट्रिक i7 ११ सप्टेंबरला होणार भारतात लॉन्च होणार
1

BMW New Luxury Cars: कारप्रेमींची प्रतीक्षा संपली! नवी BMW 7 Series अन् इलेक्ट्रिक i7 ११ सप्टेंबरला होणार भारतात लॉन्च होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.