Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच मिटणार; हडपसर-उरळी कांचनदरम्यान सहा पदरी उड्डाणपूल होणार

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या वतीने हे काम केले जाणार असून, त्यासाठी 5262 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. 20 ऑगस्टपासून या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 10, 2025 | 02:49 PM
हडपसर - उरळीकांचन दरम्यान सहा पदरी उड्डाणपूल

हडपसर - उरळीकांचन दरम्यान सहा पदरी उड्डाणपूल

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी व वाढते अपघात कमी करण्यासाठी राज्य सरकारने हडपसर-यवत दरम्यान सहा पदरी रस्त्याला नुकतीच मंजुरी दिली. यात हडपसर ते उरळीकांचन दरम्यान तब्बल 25 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या वतीने हे काम केले जाणार असून, त्यासाठी 5262 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. 20 ऑगस्टपासून या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. काम पूर्ण होण्यास किमान पाच वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दररोज सुमारे 50 हजारपेक्षा जास्त वाहने धावत आहे. यात प्रवासी वाहनासह माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या देखील अधिक आहे.

सोलापूर, हैदराबाद, बारामती या भागातून पुण्यात दाखल होणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहनधारकांना उरळी कांचनपासूनच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हीच स्थिती पुण्यातून बाहेर पडणाऱ्या वाहनचालकांची असते. त्यांना देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागत आहे. यावर तोडगा म्हणून सहा पदरी उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. यामुळे प्रवाशाच्या वेळेत किमान 30 मिनिटांची बचत होणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या नव्या उड्डाणपुलामुळे हजारो वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

कसा असणार उड्डाणपूल?

– हडपसर येथील रवीदर्शन सिग्नल पासून उड्डाणपुलाला सुरुवात

– २५ किलोमीटरचा लांबीचा असणार हा पूल.

– हडपसर- मांजरी- लोणी- उरळी कांचन-भिवरी- केसनंद फाटा – यवत असा हा मार्ग असेल.

– हडपसर ते उरुळी कांचन असा २५ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

– हडपसर ते यवत असा ३१.५ किलोमीटरचा रस्ता सहा पदरी केला जाणार.

या उड्डाणपुलाचा फायदा काय?

– सध्या हडपसर, उरुळी कांचन, लोणी काळभोर परिसरात सकाळी आणि सायंकाळी ३० ते ४५ मिनिटांची वाहतूक कोंडी होते. ती कमी होणार.

– हडपसर ते यवत प्रवासाला सध्या ६० ते ७५ मिनिटे लागतात. त्याचा कालावधी किमान ३० मिनिटांनी कमी होण्यास मदत.

– अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

– पीएमपी, एसटी गाड्यांना यवत, सासवड, बारामतीसाठी वेळेवर धावतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला फायदेशीर.

– उरुळी कांचन, लोणी काळभोर, भिवरी, यवत यांसारख्या गावांचा पुण्याशी संपर्क जलद व सुलभ होईल.

– ग्रामीण अर्थव्यवस्थेस चालना मिळेल.

– इंधन आणि वाहन चालकांचा वेळ वाचणार.

Web Title: A six lane flyover will be built between hadapsar urali kanchan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 02:49 PM

Topics:  

  • Hadapsar
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राजकारणात यायचं स्वप्न भंगलं! ७१ उमेदवारांचा ‘पत्ता कट’; कारण काय?
1

Maharashtra Politics: राजकारणात यायचं स्वप्न भंगलं! ७१ उमेदवारांचा ‘पत्ता कट’; कारण काय?

पुण्यातील पोलीस ठाणे होणार ‘ग्रीन पोलीस स्टेशन’; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती
2

पुण्यातील पोलीस ठाणे होणार ‘ग्रीन पोलीस स्टेशन’; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस स्पर्धा परीक्षा उत्साहात संपन्न; तब्बल 850 विद्यार्थ्यांचा सहभाग
3

राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस स्पर्धा परीक्षा उत्साहात संपन्न; तब्बल 850 विद्यार्थ्यांचा सहभाग

कॉपी करणाऱ्या परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द होणार; शिक्षण आयुक्त सचिंद्र सिंह
4

कॉपी करणाऱ्या परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द होणार; शिक्षण आयुक्त सचिंद्र सिंह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.