Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur BJP Controversy: भाजपातील वाद चव्हाट्यावर; सुभाष देशमुख-विजयकुमार देशमुख राजीनाम्याच्या तयारीत?

नवीन आलेल्या कार्यकत्र्यामुळे जुन्या, निष्ठावत कार्यकत्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. आपल्या उमेदवारीवर गदा येईल, अशी भीती जुन्या कार्यकत्यांना वाटत असल्यानेच नाराजीचा सूर उमटत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 28, 2025 | 08:46 AM
Solapur BJP Controversy: भाजपातील वाद चव्हाट्यावर; सुभाष देशमुख-विजयकुमार देशमुख राजीनाम्याच्या तयारीत?
Follow Us
Close
Follow Us:
  • उमेदवारीवरून भाजपमध्ये अस्वस्थता; सुभाष देशमुखांचा पक्ष नेतृत्वाला थेट इशारा
  • कार्यकर्ता इतर पक्षांकडून उभा राहिला तर आपण त्यांच्या पाठीशी राहू
  • भाजपची उमेदवारी प्रक्रिया वादात, निवडणूक समितीवरच प्रश्नचिन्ह
Solapur News: महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील विकोपाला गेलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असून आमदार विजयकुमार देशमुख यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याच्या ठामपणे पाठीशी उभे राहणार आहे. गरज पडल्यास राजीनामा देण्याची तयारी असल्याचे वक्तव्य केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर आमदार आमदार सुभाष देशमुख यांच्या वक्तव्यांतून पक्षातील अस्वस्थता, निर्णयप्रक्रियेतील संभ्रम आणि निष्ठावंत कार्यकत्यांच्या भवितव्याबाबतची चिंता समोर आली आहे. उमेदवारी देताना निष्ठावंत कार्यकत्यांवर अन्याय झाला आणि तो कार्यकर्ता इतर पक्षांकडून उभा राहिला तर आपण त्यांच्या पाठीशी राहू, असे विजयकुमार देशमुख यांनी म्हटले आहे. तर पक्षाने भूमिका बदलल्यास आपणही बदलू, असा इशारा आमदार सुभाष देशमुख यांनी दिला आहे.

Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! गेममध्ये झाली Moco Store ची एंट्री, फ्रीमध्ये क्लेम करा जिंजरब्रेड मॅन बंडल

या दोन्ही आमदारांनी वेगवेगळ्या ठिकाणी माध्यमांशी बोलताना निष्ठावंत कार्यकर्ता हा समान धागा अधोरेखित केला आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांनी सध्याच्या निवडणूक यंत्रणेबाबत उघडपणे प्रश्न उपस्थित केले. निवडणूक समितीत नेमके कोण सदस्य आहेत, कोण निर्णय घेत आहे. हेच स्पष्ट नसल्याचे त्यांनी सांगितले, समिती जाहीर झाली तेव्हा रघुनाथ कुलकर्णी यांचा समावेश होता. मात्र, नंतर त्यांची भूमिका दिसून न आल्याने संभ्रम वाढल्याचे त्यांनी नमूद केले.

काही जणांचे भाजपमध्ये प्रवेश झाले आहेत. पक्षात प्रवेश करतानाच ज्यांचा प्रवेश झाला आहे, त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, हे पक्ष नेतृत्वाने स्पष्ट सांगितले होते, जर पक्षाने त्या भूमिकेत बदल केला तर आम्हालाही आपली भूमिका बदलावी लागेल, असा थेट इशारा आमदार सुभाष देशमुख दिला. दोन ज्येष्ठ आमदारांच्या या स्पष्ट आणि आक्रमक वक्तव्यांमुळे भाजपतील उमेदवारी प्रक्रिया, अधिकारकेंद्र आणि कार्यकत्यांचे व्यवस्थापन या मुद्दधांवर पक्ष नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देत अंतर्गत्त समन्वय साधला जातो की नाही, यावरच भाजपची निवडणूक रणनीती आणि यश मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणार आहे.

प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला दोन्ही आमदारांची दांडी

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मुंबई येथील निवासस्थानी बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीस सुभाष देशमुख आणि विजय देशमुख या दोन्ही आमदारांनी पाठ फिरवली, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि आमदार देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख बैठकीस उपस्थित होते.

Sangli News: अफगाणी बेदाण्याची व्यापाऱ्यांकडून तस्करी, द्राक्षे बागायदार संघाकडून कोल्ड स्टोरेजवर धाडी

पालकमंत्र्यांकडेच अधिकार केंद्रित झाल्याची खंत

वाटाघाटी नेमक्या कोणासोबत करायच्या, हे स्पष्ट नसल्यामुळे आपण कोणाशीही संपर्क साधलेला नसल्याचे सांगत, सध्याच्या परिस्थितीत पालकमंत्र्यांकडेच सर्व अधिकार केंद्रित झाल्याचे चित्र असल्याची सूचक टिप्पणी त्यांनी केली. गेल्या पाच टर्मपासून आपल्यासोबत उभ्या असलेल्या कार्यकत्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली, निष्ठावंत कार्यकर्ता अन्य पक्षातून उभा राहिला तर त्याचा प्रचार करण्याची तयारी आमदार विजयकुमार देशमुख यांनी जाहीर केली.

निष्ठावंत कार्यकर्ता मित्रपक्षातून लढल्यास निवडून आणणे आवश्यक

नवीन आलेल्या कार्यकत्र्यामुळे जुन्या, निष्ठावत कार्यकत्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. आपल्या उमेदवारीवर गदा येईल, अशी भीती जुन्या कार्यकत्यांना वाटत असल्यानेच नाराजीचा सूर उमटत आहे. एखादा निष्ठावंत कार्यकर्ता मित्र पक्षातून उभा राहिला, तर त्याला निवडून आणणे आवश्यक आहे. तो निवडून आल्यावर पुन्हा भाजपमध्ये येईल ज्या कार्यकत्यांनी सातत्याने पक्षासाठी संघर्ष केला आहे, त्याच्या ताकदीची आणि क्षमतेची दखल घेऊन त्यांच्या पाठिशी उभे राहणे ही आपली नैतिक जवाबदारी असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले.

Air Pollution : राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता खालावली; AQI पोहोचला 400 च्या वर, श्वास घेणे झाले

शिवसेनेकडून ३० जागांची मागणी

गुरुवारी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम यांच्यात युतीबाबत झालेल्या प्राथमिक चर्चेत ५१ जागांची मागणी करण्यात आली होती, शुक्रवारी भाजपा शहराध्यक्षा तडवळकर यांन शिवसेनेला नेमक्या किती जागा हव्यात, याबाबत अचूक भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. या चर्चेदरम्यान शिवसेनेकडून ३० जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिली. शिवसेनेच्या या सुधारित प्रस्तावाबाबत भाजपा शहराध्यक्षा तडवळकर यानी मुबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत चर्चा करून अंतिम निर्णय कळविला जाईल, असे स्पष्टीकरण दिल्याचे समजते.

 

Web Title: A spark of internal conflict in the bjp mla vijaykumar deshmukh threatens to resign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 08:45 AM

Topics:  

  • BJP Politics
  • Maharashtra Local Body Election
  • Solapur News

संबंधित बातम्या

‘नेकी का काम आंदेकर का…’; पुणे तिथे काय उणे! कुख्यात गुंड आंदेकरने जयघोषात भरला उमेदवारी अर्ज
1

‘नेकी का काम आंदेकर का…’; पुणे तिथे काय उणे! कुख्यात गुंड आंदेकरने जयघोषात भरला उमेदवारी अर्ज

BMC Election मध्ये डॉन अरुण गवळी यांची एन्ट्री, दोन्ही मुलींनी दाखल केला अर्ज, कोण कुठून निवडणूक लढवणार? जाणून घ्या सविस्तर
2

BMC Election मध्ये डॉन अरुण गवळी यांची एन्ट्री, दोन्ही मुलींनी दाखल केला अर्ज, कोण कुठून निवडणूक लढवणार? जाणून घ्या सविस्तर

BMC Elections 2026: महायुतीचा ‘जागा फॉर्म्युला’ तयार, ९९% जागांवर एकमत; आज रात्रीपर्यंत अंतिम शिक्कामोर्तब
3

BMC Elections 2026: महायुतीचा ‘जागा फॉर्म्युला’ तयार, ९९% जागांवर एकमत; आज रात्रीपर्यंत अंतिम शिक्कामोर्तब

Campaign Rallies of Hindutva leaders: ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपची नवी खेळी; हिंदुत्ववादी नेत्यांच्या घेणार प्रचारसभा
4

Campaign Rallies of Hindutva leaders: ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपची नवी खेळी; हिंदुत्ववादी नेत्यांच्या घेणार प्रचारसभा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.