Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना टोला

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे वाघ असले तरी आम्ही सांगलीतील वाघ आहोत असं विधान कदम यांनी केले होते. त्यावर राऊतांनी हे भाष्य केले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 04, 2024 | 11:08 AM
Sanjay Raut

Sanjay Raut

Follow Us
Close
Follow Us:

सांगली : वाघ हा समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही. सांगलीतला वाघ कोण हे ४ जूनला निकालानंतर कळेल असा टोला उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते विश्वजित कदम यांना लगावत प्रतिउत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे वाघ असले तरी आम्ही सांगलीतील वाघ आहोत असं विधान कदम यांनी केले होते. त्यावर राऊतांनी हे भाष्य केले.

संजय राऊत म्हणाले की, ” सांगलीत वसंतदादा पाटील हा वाघ आम्ही पाहिलेला आहे. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे हे आम्ही पाहिलेत, वाघाची रचना आणि वाघाचा स्वभाव वेगळा असतो. विश्वजित कदम नक्कीच वाघ असतील पण ते वाघ आहेत की नाही हे ४ जूनला कळेल. जर त्यांनी मोठ्या ताकदीने चंद्रहार पाटलांना विजयी केले तर ते नक्कीच वाघ आहेत अशी पदवी आम्ही त्यांना देऊ.”

” मविआच्या इथल्या प्रमुख नेत्यांना स्वतःला वाघ असल्याचं सिद्ध करायचं असेल तर त्यांनी चंद्रहार पाटलांना विजयी केले पाहिजे मग आम्ही ४ जूनला येऊन या वाघांचा सत्कार करू असं त्यांनी सांगितले.

विश्वजीत यांना वाघ आहोत हे सिद्ध करावे लागेल. शिवसेना अधिकृतपणे वाघ आहे. आमचे बोधचिन्ह वाघ हे बाळासाहेब ठाकरेंनी साकारलं आहे. वाघ हा समोरून हल्ला करतो. वाघ उत्तम शिकारी असून तो समोरून हल्ला करतो. झुडपात बसून वाघ कारस्थाने करत नाही. त्यामुळे सांगलीत कोण किती वाघ हे कळेल, सांगलीतील जनता वाघासारखी आहे. ती कुठलीही कारस्थाने, डावपेच सहन न करता पैलवान चंद्रहार पाटील यांच्या मागे उभी राहील असंही संजय राऊतांनी म्हटलं.

दरम्यान, चंद्रहार पाटील कुठेही कमी पडत नाही. त्यांचे साखर कारखाने नाहीत, त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले नाहीत. संस्था बुडवल्या नाहीत. हा त्यांचा कमकुवतपणा नाही. ही त्यांची ताकद आहे. ते प्रामाणिक आहेत. असे अनेक उमेदवार मित्रपक्षाने उभे केलेत, ते कमकुवत असले तरी आम्ही त्यांचा प्रचार करतोय. हे आम्ही सांगत नाही. आम्हाला माहितीये आम्ही वाघ आहोत. आम्ही त्यांना विजयी करू हे खात्रीने सांगतो असं सांगत संजय राऊतांनी मित्रपक्षांनाही चिमटा काढला.

Web Title: A tiger attacks from the front does not plot in the bush rautas attack on vishwajit kadam maharashtra political party maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2024 | 11:08 AM

Topics:  

  • Loksabha Elections
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांचे CCTV फुटेज गायब? राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई
1

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांचे CCTV फुटेज गायब? राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई

Maharashtra Politics: संजय राऊतांच्या जिवाला धोका? बॉम्ब शोध पथक घरी दाखल
2

Maharashtra Politics: संजय राऊतांच्या जिवाला धोका? बॉम्ब शोध पथक घरी दाखल

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये राज ठाकरेंवर अन्याय? आरोप होताच संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये राज ठाकरेंवर अन्याय? आरोप होताच संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

‘गेल्या 60 वर्षांत शिवसेनेने कधीही सौदेबाजी केली नाही, पण शिंदेंनी…’; संजय राऊत यांचे टीकास्त्र
4

‘गेल्या 60 वर्षांत शिवसेनेने कधीही सौदेबाजी केली नाही, पण शिंदेंनी…’; संजय राऊत यांचे टीकास्त्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.