Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मित्रासोबत फिरायला गेलेली तरुणी नीरा नदीत गेली वाहून; हातपाय धुण्यासाठी उतरली अन्…

नीरा नदीच्या (Nira River) पात्रात हातपाय धुण्यासाठी उतरलेल्या तरुणीचा तोल गेल्याने ती नदीपात्रात घसरून पडली. नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यामुळे ती वाहून गेली. ही दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास हरतळी तालुका खंडाळा गावच्या हद्दीत घडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 05, 2023 | 06:45 PM
नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; पोहोण्यासाठी पाण्यात उतरला अन् बुडून मृत्यू झाला

नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; पोहोण्यासाठी पाण्यात उतरला अन् बुडून मृत्यू झाला

Follow Us
Follow Us:

सातारा : नीरा नदीच्या (Nira River) पात्रात हातपाय धुण्यासाठी उतरलेल्या तरुणीचा तोल गेल्याने ती नदीपात्रात घसरून पडली. नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यामुळे ती वाहून गेली. ही दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास हरतळी तालुका खंडाळा गावच्या हद्दीत घडली.

तेजल उर्फ तेजू वरूण साळुंखे (वय २३ रा. वरुड तालुका खटाव, जिल्हा सातारा) असे नीरा नदी पात्रात वाहून गेलेल्या तरुणीचे नाव आहे. पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील वेळवंडी आणि नीरा नदीच्या संगमावर भाटघर धरण आहे. धनगरवाडी गावाच्या हद्दीत असणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करणारी तेजल साळुंखे ही कंपनीतील मित्र दिगंबर साळेकर (रा. निगुडघर, तालुका भोर) यांच्या समावेत फिरण्यासाठी आली होती. यावेळी नीरा नदीच्या पात्रात असणाऱ्या पावर हाऊसमधून पाणी सोडण्यात आले होते. एका पुलाजवळ नदीपत्रात तेजल साळुंखे हातपाय धुण्यासाठी उतरली. त्यावेळी पाय घसरून पाण्यात पडल्याने ती वाहून गेली.

घटनास्थळी असणारा तिचा मित्र दिगंबर साळेकर यांनी भोर पोलीस यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर बोर आणि शिरवळ पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम राबवली. मात्र, अंधार पडल्याने ती थांबवण्यात आली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी महाबळेश्वर ट्रॅकर प्रतापगड रेस्क्यू टीम, शिरवळ रेस्क्यू टीमने पुन्हा शोध मोहीम सुरू केली. दिवसभर नदीपात्राच्या तिन्ही टीमने शोध घेतला. परंतु, दुसऱ्या दिवशीही तरूणीचा पत्ता लागला नाही.

Web Title: A young girl who went for a walk with a friend got swept away in the river nira nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2023 | 06:45 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nira News

संबंधित बातम्या

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
1

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Shrikant Shinde: Gen Z साठी शिवसेनेचा नवा प्लॅन! स्पर्धा परीक्षा केंद्रांसह लोकप्रतिनिधींकडे फेलोशिपची संधी
2

Shrikant Shinde: Gen Z साठी शिवसेनेचा नवा प्लॅन! स्पर्धा परीक्षा केंद्रांसह लोकप्रतिनिधींकडे फेलोशिपची संधी

SIR Voter List: SIRमध्ये मोठी तफावत! तब्बल ४.६४ लाख मतदारांचा पत्ता नाही! ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी होणार जाहीर
3

SIR Voter List: SIRमध्ये मोठी तफावत! तब्बल ४.६४ लाख मतदारांचा पत्ता नाही! ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी होणार जाहीर

Dombivli News: डोंबिवलीतील माणगावमध्ये चाळींवर जेसीबी; रहिवासी-विकासक आमनेसामने, मालकी हक्कावरून वाद
4

Dombivli News: डोंबिवलीतील माणगावमध्ये चाळींवर जेसीबी; रहिवासी-विकासक आमनेसामने, मालकी हक्कावरून वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.