Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाकण नगरपरिषदेत मालमत्ता करासाठी ‘अभय योजना’; 100 टक्के शास्ती माफी जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने सोमवारी (दि.२३) यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. मात्र, या योजनेत मूळ मालमत्ता कराच्या रकमेत कोणतीही सवलत दिली जाणार नसून केवळ शास्तीवरच पूर्ण माफी लागू राहणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 24, 2026 | 11:03 AM
टॅक्स कलेक्शनमध्ये अकोला अव्वल; खामगाव दुसऱ्या स्थानावर तर अमरावती विभाग...

टॅक्स कलेक्शनमध्ये अकोला अव्वल; खामगाव दुसऱ्या स्थानावर तर अमरावती विभाग...

Follow Us
Follow Us:

चाकण : चाकण नगरपरिषद क्षेत्रातील थकित मालमत्ता कराची प्रभावी वसुली करण्यासाठी राज्य शासनाने मोठा दिलासा देत ‘अभय योजना’ लागू करण्यास मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत करदात्यांना मालमत्ता करावरील शास्ती (दंड) पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने सोमवारी (दि.२३) यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार १९ मे २०२५ पर्यंतची थकीत मालमत्ता कराची रक्कम ३१ मार्च २०२६ पर्यंत भरल्यास संबंधित करदात्यांना १०० टक्के शास्ती माफीचा लाभ मिळणार आहे. मात्र, या योजनेत मूळ मालमत्ता कराच्या रकमेत कोणतीही सवलत दिली जाणार नसून केवळ शास्तीवरच पूर्ण माफी लागू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेत थकीत कर भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे अधिकार चाकण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले असून, करदात्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी नगरपरिषदेकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी पुणे यांनी या योजनेअंतर्गत थकीत करांची १०० टक्के वसुली सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच घरपट्टीच्या पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचाही आदेश देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू असून यानंतर अशा प्रकारची कोणतीही सवलत देण्यात येणार नाही. त्यामुळे करदात्यांनी ही अंतिम संधी मानून तात्काळ थकीत कर भरावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

702.73 कोटींचा मालमत्ता कर वसूल

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत १ एप्रिल २०२५ पासून ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ७०२ कोटी ७३ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. तसेच पुढील दोन महिन्यांत मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीने व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. तरी ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी तो लवकरात लवकर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

हेदेखील वाचा : New Income Tax Act 2025 : १ एप्रिलपासून लागू होणार नवीन आयकर कायदा; अर्थमंत्री सीतारामन यांचे ६ महत्त्वाचे आदेश

Web Title: Abhay yojana for property tax at chakan municipal council

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 11:03 AM

Topics:  

  • Chakan News
  • Property Tax

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.