Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिजित बिचुकले पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात, भाजप आणि शरद पवारांवर साधला निशाणा

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रींगणात उतरणार आहेत. अभिजित बिचुकले हे सातारा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 17, 2024 | 12:11 PM
अभिजित बिचुकले पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात, भाजप आणि शरद पवारांवर साधला निशाणा
Follow Us
Follow Us:

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रींगणात उतरणार आहेत. अभिजित बिचुकले हे सातारा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मात्र त्यापूर्वी अभिजित बिचुकले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), भाजप यांच्यासह शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

अभिजित बिचुकले साताऱ्यातून निवडणूक लढणार

अभिजित बिचुकले यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर खासदार म्हणून निवडून आल्यावर कोणती कामे करणार हे स्पष्ट केले आहे. २००४ , २००९ ,२०१४, २०१९ या निवडणुकीमध्ये मला चांगला पाठिंबा दिला आहे. म्हणून आता देखील मी निवडणुकीचा अर्ज भरत आहेत. मतदारराजा जागृत झाला पाहिजे,असे अभिजित बिचुकले म्हणाले. दोन रुपयाची दारू पाजून, मटण देऊन शक्ती प्रदर्शन केलं जात नाही, असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

१९ एप्रिल रोजी अभिजित बिचुकले सातारा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उदयनराजे भोसले यांची उमेदवारी घोषित होण्यासाठी बराच वेळ लागला, त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. जर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मला निवडून दिले तर मी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारक पाठपुरावा करेन, असे सांगत अभिजित बिचुकले यांनी निवडणुकीची रणशिंग फुंकली आहेत. मतदार राजा जागृत आहे आणि येत्या १९ एप्रिलला अर्ज भरणार असल्याची घोषणा अभिजित बिचुकले यांनी केली आहे.

अभिजित बिचुकले यांनी साताऱ्यातील भाजपचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावर देखील टीका केली आहे. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवायची उद्यान दादा यांची इच्छा होती.त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. पण भाजपने छत्रपतींना किती सन्मान दिला याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी आणि लोकांनी केले पाहिजे, असे म्हणत अभिजित बिचुकले यांनी आव्हान केले आहे.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव संसद भवनला द्यावे, अशी मागणी मी केली आहे. समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बनवण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ वर्षांपूर्वी भूमिपूजन झाले होते. पण स्मारकाची एकही वीट रचली गेली नाही, असे म्हणत अभिजित बिचुकले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारस म्हणून माझ्या पाठिशी उभे राहा, असे आव्हान अभिजित बिचुकले यांनी जनतेला केले आहे.

उदयनराजे आणि शरद पवारांचे हार्डवैर

शरद पवार आणि उदयनराजे यांचे हाडवैर आहे. अभयसिंह महाराज यांचेही खच्चीकरण शरद पवार यांनी केले. तसेच योग्य वेळ आल्यानंतर त्यांच्यावर बोलणार असल्याचे अभिजित बिचुकले यांनी सांगितले आहे. मी या लढाईत एकटा लढत असून लोकांनी पाठिशी उभे राहण्याचे आव्हान मी करत आहे, असे अभिजित बिचुकले म्हणाले.

Web Title: Abhijit bichukle once again targeted bjp and sharad pawar in the election arena loksabha election nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2024 | 12:11 PM

Topics:  

  • BJP
  • Election2024
  • Narendr Modi

संबंधित बातम्या

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच
1

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच

MPSC Protest : रोहित पवारांचं आंदोलन ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’? 200 ते 250 गाड्यांमधून कार्यकर्ते आणले’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
2

MPSC Protest : रोहित पवारांचं आंदोलन ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’? 200 ते 250 गाड्यांमधून कार्यकर्ते आणले’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Rajysabha Election : भाजपने UP मधील 8 उमेदवारांची यादी केली जाहीर, दोन महिलांचा समावेश
3

Rajysabha Election : भाजपने UP मधील 8 उमेदवारांची यादी केली जाहीर, दोन महिलांचा समावेश

BrijBhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या कामगिरीबाबत बृजभूषण काय म्हणतात बघा, कधी काळी कुस्तीपटूंनी केलेले गंभीर आरोप
4

BrijBhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या कामगिरीबाबत बृजभूषण काय म्हणतात बघा, कधी काळी कुस्तीपटूंनी केलेले गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.