Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Bank Election : शिंदे गटाचा निर्णय ठरला! स्वबळावर लढणार की महायुतीसोबत? पुरंदर बंगल्यावर राजकीय खलबतं!

Mumbai Bank Election : मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. मात्र जागावाटपाचा पेच कायम आहे. दुसरीकडे सातारा जिल्हा बँकेत शंभुराज देसाईंच्या खेळीने भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं.

  • By विवेक
Updated On: Nov 20, 2026 | 03:31 PM
mumbai bank mahayuti

mumbai bank mahayuti

Follow Us
Follow Us:
  • मुंबई जिल्हा बँकेसाठी महायुतीची महत्त्वाची बैठक
  • शिंदे गट स्वबळावर लढणार की महायुतीसोबत?
  • पुरंदर बंगल्यावर दिग्गज नेत्यांची उपस्थिती
 

मुंबई : मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधी राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गट ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. याबाबत मोठी बातमी समोर आली असून पुरंदर बंगल्यावर दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली असून राजकीय खलबतं पार पडत आहेत. (Mumbai Bank Election)

उपसभापती सचिन अहिर यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या पुरंदर बंगल्यावर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीला सचिन अहिर, मंत्री उदय सामंत, भाजप नेते प्रवीण दरेकर, सिद्धार्थ कांबळे आणि शिवाजीराव नलावडे यांची उपस्थिती होती.

मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक एकत्रितपणे लढवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. सुरुवातीला शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र आता मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढवण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच महायुतीने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

रायगडमधून मोठी बातमी! भाजप आमदाराला न्यायालयाचा दणका! 3 वर्षे कारावासाची शिक्षा, अलिबाग कोर्टाच्या निकालाने राजकीय वर्तुळात चर्चा

जागावाटपाचा तिढा अद्याप कायम

महायुती एकत्र निवडणूक लढवणार हे जवळपास स्पष्ट झालं असलं तरी खरी अडचण आता जागावाटपावरून निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत जागावाटपाचं चित्र स्पष्ट होऊ शकतं.

सातारा जिल्हा बँकेत भाजपला मोठा धक्का

दुसरीकडे सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणात मात्र भाजपला मोठा धक्का बसला आहे. शंभुराज देसाई यांच्या राजकीय खेळीमुळे भाजपच्या हातातून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची संधी निसटली. बँकेच्या 21 सदस्यांपैकी बहुमतासाठी 12 मतांची गरज होती. भाजपकडे सर्वाधिक 9 सदस्य होते. तर शिवसेना शिंदे गटाकडे 4 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 8 सदस्य होते. शंभुराज देसाई यांनी राष्ट्रवादीच्या 8 आणि शिंदे गटाच्या 4 सदस्यांची मोट बांधली. त्यामुळे 12 सदस्यांचं बहुमत तयार झालं. परिणामी राष्ट्रवादी अजित पवार गटाला अध्यक्षपद, तर शिवसेना शिंदे गटाला उपाध्यक्षपद मिळालं.

एकीकडे मुंबईत महायुतीची एकजूट दिसत असताना साताऱ्यात भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील या निवडणुकांचे राजकीय पडसाद आगामी काळातही उमटण्याची शक्यता आहे.

Mahayuti Politics: महायुतीत मोठी फूट; काँग्रेससोबत हात मिळवत शिंदे गट-राष्ट्रवादीचा भाजपला धक्का

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक कोणत्या आघाडीकडून लढवली जाणार आहे?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक महायुती एकत्रितपणे लढवणार आहे. यामध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटासह महायुतीतील घटक पक्ष सहभागी होणार आहेत.

  • Que: मुंबई जिल्हा बँकेच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय कोण घेणार?

    Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

  • Que: सातारा जिल्हा बँकेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद कोणत्या पक्षाला मिळालं?

    Ans: सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा अध्यक्ष, तर शिवसेना शिंदे गटाचा उपाध्यक्ष झाला. या राजकीय समीकरणामुळे भाजपला दोन्ही पदांपासून दूर राहावं लागलं.

Web Title: Mumbai bank election mahayuti shinde bjp seat sharing vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • BJP
  • Mumbai Bank
  • Mumbai News
  • shivsena

संबंधित बातम्या

IND Vs NZ: ‘त्याचे नाव सिराज म्हणून…’; कॉँग्रेस नेत्याचे ‘ते’ विधान अन् प्रकरणाला धार्मिक रंग?
1

IND Vs NZ: ‘त्याचे नाव सिराज म्हणून…’; कॉँग्रेस नेत्याचे ‘ते’ विधान अन् प्रकरणाला धार्मिक रंग?

Mahayuti Politics: महायुतीत मोठी फूट; काँग्रेससोबत हात मिळवत शिंदे गट-राष्ट्रवादीचा भाजपला धक्का
2

Mahayuti Politics: महायुतीत मोठी फूट; काँग्रेससोबत हात मिळवत शिंदे गट-राष्ट्रवादीचा भाजपला धक्का

Rahul Gandhi Chicago Speech: “मोदी सरकारमधील काही मंत्री आमच्या संपर्कात…; राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ
3

Rahul Gandhi Chicago Speech: “मोदी सरकारमधील काही मंत्री आमच्या संपर्कात…; राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ

Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशीनिमित्त दादरमध्ये भव्य दिंडी सोहळा; २१ नोव्हेंबरला विठ्ठल नामाचा गजर
4

Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशीनिमित्त दादरमध्ये भव्य दिंडी सोहळा; २१ नोव्हेंबरला विठ्ठल नामाचा गजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.