
भारत न्यूझीलंड पहिल्या कसोटीत सिराजला स्थान नाही
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याची संघात निवड झाल्याने राजकीय वाद पेटला आहे. या मुद्द्यावरून भाजप आणि कॉँग्रेस आमनेसामने आले आहेत. काँग्रेस खासदार इमरान मसूद यांनी सिराजच्या निवडीवरून प्रश्न उपस्थित करत हा प्रकार धार्मिक भेदभावाशी जोडल्यानंतर, भाजपने त्यांच्या विधानाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.
मोहम्मद सिराजला न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सामन्यात संधी न दिल्याने कॉँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी केलेले विधान वादात सापडले आहे. चांगले कामगिरी आणि प्रदर्शन असून देखील सिराजला संधी दिली गेली नाही. त्याचे नाव ‘सिराज’ आहे त्यामुळे त्याला संधी दिली गेली नाही. खेळाडूचे नाव पाहून तुम्ही त्याला संघाबहेर ठेवणार असाल तर, हा पूर्णपणे धार्मिक भेदभाव असल्याचे खासदार मसूद यांनी म्हटले आहे.
#WATCH | Delhi: On Cricketer Mohammed Siraj, Congress MP Imran Masood says, “It is being said that despite his good performance, he was not given a place in the team. His name is ‘Siraj ‘, and that is why he was not given a place. If you are not selecting him despite his good performance, the discrimination is clear.” — ANI (@ANI) November 20, 2026
इम्रान मसूद यांनी केलेल्या विधानळा भाजपने देखील प्रत्युत्तर दिल्याचे समजते आहे. कॉँग्रेस आता क्रिकेट संघाच्या निवडीमध्ये देखल वोट बँकचे राजकारण करत असल्याचे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे. पहिल्या कसोटीत मोहम्मद सिराजला संधी न मिळाल्याच्या मुद्द्यावर त्यांनी सवाल उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणामागे धार्मिक भेदभावाची किनार असल्याचा आरोप मसूद यांनी केला होता.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वगळण्याचा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अशात भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री असो, महान फलंदाज सुनील गावस्कर असो वा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे, या सर्वांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. सिराजसारख्या अनुभवी आणि आक्रमक गोलंदाजाला वेगवान गोलंदाजीसाठी पोषक खेळपट्टी असताना संधी न देणे आश्चर्यकारक असल्याचे मत या तिघांनी व्यक्त केले आहे.
Ans: मोहम्मद सिराजच्या निवडीवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस खासदार इमरान मसूद यांनी या प्रकरणावर धार्मिक भेदभावाचा मुद्दा उपस्थित केला, तर भाजपने त्यांच्या विधानाचा निषेध केला आहे.
Ans: मोहम्मद सिराजच्या निवडीवरून भाजप आणि काँग्रेस हे दोन राजकीय पक्ष आमनेसामने आले आहेत.