Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खंडाळा बसस्थानकात अपघात; एसटी चालकाने बस सुरु करताच गाडी पुढे गेली अन्…

पारगाव-खंडाळा आगाराची स्वारगेट-महाबळेश्वर बस चालक दत्तात्रय राऊत हे स्वारगेटहून सकाळी घेऊन निघाले होते. ते पारगाव-खंडाळा बसस्थानकात आले. मात्र,बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येत बस थांबवली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 28, 2025 | 11:15 AM
खंडाळा बसस्थानकात अपघात

खंडाळा बसस्थानकात अपघात

Follow Us
Close
Follow Us:

खंडाळा : खंडाळा बसस्थानकात एक विचित्र घटना घडली. या ठिकाणी एसटी बस सुरु करताच ती भरधाव वेगाने थेट उपहारगृहाच्या बाजूला असणाऱ्या टाक्यांची भिंती पाडून झुडपात घुसली. यामध्ये चालकासह चार जण गंभीर जखमी झाले. सुदैवाने शाळांना स्थानिक सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांची गर्दी बसस्थानकात नसल्याने एक अनर्थ टळला असल्याची चर्चा सुरु होती. बसस्थानकात घडलेल्या घटनेमुळे पारगाव-खंडाळा आगारात तांत्रिक बिघाड व नादुरुस्त एसटी बसेसचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पारगाव-खंडाळा आगाराची स्वारगेट-महाबळेश्वर बस चालक दत्तात्रय राऊत हे स्वारगेटहून सकाळी घेऊन निघाले होते. ते पारगाव-खंडाळा बसस्थानकात आले. मात्र,बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येत बस थांबवली. बसमध्ये २७ प्रवासी होते. यातील ४ जण १० मीटरच्या अंतरावर उतरल्याने अपघातावेळी २३ प्रवासी यात होते. बसस्थानकात वाहक, काही प्रवाशी उतरले. त्यानंतर ती बस अचानक पुढे सरकली.

यावेळी दोन दुचाकी, भिंत व पाण्याचे टाक्याला धडकून ही गाडी झाडाला अडकली. या अपघातात राहुल रामचंद्र कुंभार (भोगाव ता. वाई), कमल बाळु कुंभार (रा. शिरवळ) तर मेधा फडतरे (पुणे) व चालक दत्तात्रय राऊत हे गंभीर जखमी झाले. तसेच दोन दुचाकी, भिंत व टाक्याचे मोठे नुकसान झाले. अपघाताचे वृत्त समजताच आगार व्यवस्थापक बिसमिल्ला सय्यद, पवन वाघेला यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

उत्तर प्रदेशातही बसचा अपघात

दुसऱ्या एका घटनेत, उत्तर प्रदेश राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशातून जाणाऱ्या आग्रा-लखनौ महामार्गावर एका प्रवासी बसला भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. इटावा जिल्ह्यात हा अपघात झाला आहे. यामध्ये 2 जणांचा मृत्यू तर ५० जण जखमी झाल्याचे समजते.

Web Title: Accident at khandala bus stand 4 people injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 11:15 AM

Topics:  

  • Accident News
  • ST Bus Accident

संबंधित बातम्या

Tamhini Ghat Accident: सहा मित्रांच्या स्वप्नाची शोकांतिका..! ताम्हिणी घाटात थार कोसळून सहा जणांचा मृत्यू  video
1

Tamhini Ghat Accident: सहा मित्रांच्या स्वप्नाची शोकांतिका..! ताम्हिणी घाटात थार कोसळून सहा जणांचा मृत्यू video

पुण्यात हिट अँड रनमध्ये सात वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; बालेवाडीतील धक्कादायक घटना
2

पुण्यात हिट अँड रनमध्ये सात वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; बालेवाडीतील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.