
गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातात बाबाराव ज्ञानोबा टेकाम (वय ६०), राहुल सुधाकरराव ठाकरे (वय २५) आणि प्रीतम रामराव प्रधान (वय ३८) या यवतमाळ येथील तिघांचा मृत्यू झाला आहे. चालक प्रतीक अरविंद अडकिने (२६), दत्ता मनोहर मेश्राम (३५) आणि यशवंत अरविंद पाटील (वय २५) हे जखमी झाले.
माहिती मिळताच पोलिस निरीक्षक देविदास चोपडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने टेम्पो बाहेर काढण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार भोंडवे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
रेणुका मातेचे दर्शन घेऊन परत येताना झाला अपघात
यवतमाळ येथील फर्निचर दुकानात काम करणारे सहा कामगार मॅक्झिमो जितो या टेम्पोतून बुधवारी रात्री माहूरला आले होते. रेणुका मातेचे दर्शन आणि कार्यक्रम आटोपून ते परतत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामागील घाटातील पहिल्या धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रकाश चालकाच्या डोळ्यांवर पडला. त्यातच समोरचे वाहन विरुद्ध दिशेने आल्याने चालकाचा ताबा सुटला आणि टेम्पो दरीत कोसळला. या वळणावर संरक्षक कठडे नसल्याचेही समोर आले आहे.
हे सुद्धा वाचा : लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
Ans: या भीषण अपघातात यवतमाळ येथील तीन भाविकांचा मृत्यू झाला.
Ans: चालकाचे नियंत्रण सुटल्याने भाविकांचा टेम्पो सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळला.
Ans: या अपघातात चालक प्रतीक अडकिने यांच्यासह तिघे किरकोळ जखमी झाले.