
सिन्नरजवळ गोंदे-दातली मार्गावर भीषण अपघात; कथड्याला पीकअप धडकून चार मजूरांचा मृत्यू
सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावरील गोंदे ते दातली अंडरब्रिजदरम्यान, दोडी शिवारात शनिवारी (दि. १७) पहाटे तीनच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. काँक्रीटीकरणाचे काम आटोपून सिन्नरच्या दिशेने निघालेल्या मजुरांची पिकअप गाडी उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली. या अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मयतातील तीन मजूर हे पश्चिम बंगाल तर एक जण बिहार राज्यातील रहिवासी आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एम.डी. बिसू आसामुद्दीन (वय २५, रा. तरसूर, ता. तलसूर, जि. मालदा, पश्चिम बंगाल) साजेमन अली साजीबुर रहमान (वय २१, रा. बादशाही रस्ता, तलसूर, जि. मालदा, पश्चिम बंगाल) अब्दुल मोहम्मद हुसेन कलाम (वय २२, रा. गाजपाडा, ता. लोहडांगा, जि. किशनगंज, बिहार) खुर्शीद अलीम अब्दुल रहीम (वय १९, रा. आमडोल घाट, ता. हरिश्चंद्रपूर, जि. मालदा, पश्चिम बंगाल) अशी अपघातात मृत झालेल्या मजुरांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच सिन्नर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका चालक पुरुषोत्तम भटजिरे हे शाम लोंढे आणि गणेश गायकवाड यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून शिवाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यातील चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. अन्य पाच जखमींना यशवंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कामावरून परतताना अपघात
नाशिक-पुणे महामार्गावरील दोडी शिवारात सध्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामावर असलेले मजूर शनिवारी रात्री उशिरापर्यंत काम करत होते. काम आटोपल्यानंतर ते पिकअप (एम एच-१४, केक्यू-२३६१) वाहनातून गुरेवाडी शिवारातील कॅम्पकडे जात होते. दरम्यान, गोंदे ते दातली अंडरब्रिज परिसरात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, तिघे मजूर उड्डाणपुलावरून डगमधून थेट खाली रस्त्यावर कोसळले.
हे सुद्धा वाचा : पुणेकरांनो, रस्त्यावर निघण्याआधी ही बातमी वाचा! कात्रज चौकात जड वाहनांना बंदी
गंभीरांवर उपचार
अपघातात तुहीत आलम (वय १९), साजिद आलम (वय १९), समीर हुसेन (वय २०), महेबुबा आलम (वय २३) आणि आयाब अली (वय २०) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक हवालदार राहुल निरगुडे, अर्जुन निंबेकर करत आहेत.
Ans: नाशिक-पुणे महामार्गावरील गोंदे ते दातली अंडरब्रिजदरम्यान, दोडी शिवारात शनिवारी (१७ ऑक्टोबर) पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला.
Ans: पिकअप गाडी उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकल्याने चार मजुरांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
Ans: मृतांपैकी तीन मजूर पश्चिम बंगालमधील, तर एक मजूर बिहारमधील रहिवासी होता. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.