Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News : चिखली गावात दुकानांना लागली आग! जयस्तंभ चौकातील घटना; जीवितहानी टळली

चिखलीतील जयस्तंभ चौक परिसरात रविवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत सहा दुकाने जळून खाक झाली. भेळ सेंटर, फळांचे दुकान, घड्याळाचे दुकान तसेच इतर काही लहान दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 16, 2026 | 06:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या जयस्तंभ चौक परिसरात रविवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत एकूण सहा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून दुकानांतील मोठ्या प्रमाणावर साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयस्तंभ चौकातील भेळ सेंटर, बागवान यांचे फळांचे दुकान, घड्याळाचे दुकान तसेच इतर काही लहान व्यावसायिकांची दुकाने अचानक लागलेल्या आगीमुळे काही वेळातच धगधगू लागली. दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात धुराचे मोठे लोट पसरले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी तातडीने अग्निशमन दलाला कळवले.

Pune ZP : सुनेत्रा पवारांकडे निर्णयाचा अधिकार; काही इच्छुकांकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सह्यांचे राजकारण

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी काही वेळातच घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी तातडीने पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या दरम्यान स्थानिक सामाजिक कार्यकर्ते गोपाल देव्हडे यांनीही धाडस दाखवत अग्निशमन दलाच्या जवानांसोबत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत केली. त्यांनी स्वतः वॉटर गन हातात घेऊन आग विझविण्याच्या कामात सहभाग घेतला. आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिक, दुकानदार आणि प्रवाशांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांना सुरक्षित अंतरावर उभे राहण्याच्या सूचना देत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला.

या आगीत सहा दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून दुकानांतील साहित्य, उपकरणे आणि मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. घटनेची माहिती मिळताच काही स्थानिक लोकप्रतिनिधींनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना प्रशासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक व्यापारी आणि नागरिकांकडून करण्यात आली.

हर्षवर्धन सपकाळांनी घेतली इराणचे कॅान्सुल जनरल मोतलाघ यांची भेट; ‘या’ मुद्द्यावर झाली चर्चा 

दरम्यान, घटनास्थळापासून अवघ्या सुमारे २०० मीटर अंतरावर पेट्रोल पंप असल्याने मोठा अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. आग आणखी वाढली असती तर पेट्रोल पंपालाही धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे अग्निशमन दलाने वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. सध्या आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी प्रशासनाकडून याबाबत तपास सुरू आहे. संबंधित विभागाकडून घटनेची चौकशी करून आगीचे नेमके कारण शोधले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Accident in chikhali village incident at jaystambh chowk no loss of life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Buldhana News : गॅस दरवाढ, तुटवड्याविरोधात महिला आक्रमक! शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
1

Buldhana News : गॅस दरवाढ, तुटवड्याविरोधात महिला आक्रमक! शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Buldhana : LPG गॅस सिलेंडर साठी सकाळी चार वाजेपासूनच लागतात रांगा
2

Buldhana : LPG गॅस सिलेंडर साठी सकाळी चार वाजेपासूनच लागतात रांगा

Buldhana News: गारपीट आणि वादळ! चिखली तालुक्यात पिकांचे भारी नुकसान; जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
3

Buldhana News: गारपीट आणि वादळ! चिखली तालुक्यात पिकांचे भारी नुकसान; जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

Washim News : शाश्वत शेतीसाठी समन्वयाची नितांत गरज! जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन; जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा
4

Washim News : शाश्वत शेतीसाठी समन्वयाची नितांत गरज! जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन; जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.