Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim : काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनाने वेधले लक्ष! राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहाराचा जिल्ह्यामधून निषेध

अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 'रघुपती राघव राजाराम सत्याग्रह' आंदोलन करण्यात आले. श्रीराम, बालाजी आणि शनी मंदिरात दिंडी, भजन, पूजन, आरती आणि प्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 15, 2026 | 08:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ आंदोलन करण्यात आले. वाशिम शहरातील श्रीराम मंदिर, बालाजी मंदिर आणि शनी मंदिर येथे टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. विविध मंदिरांमध्ये दर्शन, भजन, पूजन, आरती, पसायदान आणि प्रसाद वितरणाचा कार्यक्रमही पार पडला. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वारकरी आणि भजनी मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Satara News : स्थायी समितीत गदारोळ; वादानंतर खासदार समर्थक नगरसेवकांचा वॉकआऊट, तासभर कामकाज ठप्प

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांनी प्रभू श्रीरामाकडे प्रार्थना करत अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीचा कथित अपहार करणाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी आणि त्यांच्या कर्माची योग्य शिक्षा मिळावी, अशी भावना व्यक्त केली. त्यांनी कथितरित्या दानपेटीतील रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तूंचा अपहार झाल्याचा आरोप करत या प्रकाराचा निषेध नोंदवला. भाविकांच्या श्रद्धेशी संबंधित अशा घटनांमुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

आंदोलनादरम्यान वाशिमचे कीर्तनकार पंढरीनाथ इंगोले महाराज यांनी प्रभू श्रीरामाच्या विचारांवर विवेचन केले. उपस्थित वारकरी आणि भजनी मंडळांनीही राम मंदिरातील कथित गैरव्यवहाराबाबत नाराजी व्यक्त केली. सत्याग्रहादरम्यान भक्तिमय वातावरणात भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यामुळे आंदोलनाला धार्मिक आणि सामाजिक स्वरूप प्राप्त झाले.

कार्यक्रमानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ आंदोलनाचा समारोप करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांनी केले.

विठूनामाचा गजर अन्…! सोमेश्वरनगर येथे संत सोपानकाका पालखीचे पहिले गोल अश्वरिंगण उत्साहात संपन्न; दीड लाख वारकऱ्यांची उपस्थिती

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस दिलीपराव सरनाईक, किसनरावजी मस्के, दिलीपराव देशमुख, महादेवराव सोळंके, विजयराव देशमुख, परसराम भोयर, गजानन गोटे, राजू वानखेडे, सागर गोरे, समाधान माने, उज्वल देशमुख, निर्मल बसंतवाणी, दादाराव देशमुख, हरीश चौधरी, सुरेश रत्नपारखी, नयन करे, सुभाषराव देशमुख, संतोष गावंडे, मृदंगाचार्य विवेक महाराज इंगोले यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Congress protests in washim over alleged irregularities in ram mandir donations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 08:52 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news

संबंधित बातम्या

Buldhana News : सेवानिवृत्तीनंतरही चित्रकलेने समाजसेवा! शिक्षक जगन्नाथ निकम यांचा प्रेरणादायी उपक्रम
1

Buldhana News : सेवानिवृत्तीनंतरही चित्रकलेने समाजसेवा! शिक्षक जगन्नाथ निकम यांचा प्रेरणादायी उपक्रम

Deulgaon Raja : अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त! तहसीलदारांच्या पथकाची धडक कारवाई
2

Deulgaon Raja : अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त! तहसीलदारांच्या पथकाची धडक कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.