Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्न समारंभातून परतताना स्कॉर्पिओचा अपघात; एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी

चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेली स्कॉर्पिओ उड्डाणपुलावरून खाली कोसळली. यात लग्न समारंभातून परत येत असलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये चार महिलांचा समावेश आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 08, 2025 | 09:25 AM
मोशी-चाकण मार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दोघांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

मोशी-चाकण मार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दोघांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

Follow Us
Follow Us:

कळमेश्वर : चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेली स्कॉर्पिओ उड्डाणपुलावरून खाली कोसळली. यात लग्न समारंभातून परत येत असलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये चार महिलांचा समावेश आहे. ही घटना काटोल-कळमेश्वर-नागपूर मार्गावरील डोरली (भिंगारे) शिवारात घडली.

आयएमटी कॉलेजसमोर ही स्कॉर्पिओ आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी थेट पुलावरून कोसळली. बुधवारी (दि.4) दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. यामध्ये स्कॉर्पिओ चालक रितेश नंदकिशोर गजभिये (वय 22), चंद्रकला गजभिये (वय 45), भावना गजभिये (वय 24, तिघेही रा. भरतवाडा, ता. नागपूर ग्रामीण), अनिता गजभिये (वय 40) व आचल गजभिये (वय 21, दोघीही रा. पारडी, नागपूर) यांचा समावेश असून, श्रीराम गजभिये (वय 48), मनीष गजभिये (वय 18), नंदकिशोर गजभिये (वय 50) व चुटकी (वय 5, सर्व रा. भरतवाडा, ता. नागपूर ग्रामीण) अशी किरकोळ जखमींची नावे आहे.

सर्व जण एकाच कुटुंबाचे सदस्य असून, ते बुधवारी काटोल शहरात लग्नाला गेले होते. लग्न आटोपल्यानंतर ते स्कॉर्पिओने (एमएच-49/बी-2744) काटोलहून कळमेश्वर मार्गे नागपूरला जात होते. दरम्यान, डोरली ता. काटोल शिवारात चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेली स्कॉर्पिओ उड्डाणुलावरून खाली कोसळली. यात पाच जण गंभीर, तर चौघे किरकोळ जखमी झाले.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना लगेच कळमेश्वर येथील ग्रामीण रुणालयात आणले. सर्वांवर प्रथमोपचार केल्यानंतर गंभीर जखमींना नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये भरती केले. किरकोळ जखमींना उपचारानंतर सुटी देण्यात आली. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Accident in nagpur 5 people injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 09:25 AM

Topics:  

  • Accident Case
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur District : पावसाने पाठ फिरवली, धरणे आटली; पाच प्रमुख जलाशयांत केवळ ६१% पाणीसाठा
1

Nagpur District : पावसाने पाठ फिरवली, धरणे आटली; पाच प्रमुख जलाशयांत केवळ ६१% पाणीसाठा

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?
2

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू
3

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू

Nagpur News :इमारत-उपकरणे सज्ज; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल रखडले, आता ३ महिन्यांची नवी मुदत
4

Nagpur News :इमारत-उपकरणे सज्ज; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल रखडले, आता ३ महिन्यांची नवी मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.