Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News :स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची १० कोटींची बचत; दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैसे सवलत

Nagpur News : महावितरणच्या स्मार्ट टीओडी मीटरमुळे नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील ग्राहकांनी सात महिन्यांत १०.३७ कोटी रुपयांची बचत केली. सध्या प्रति युनिट ८५ पैसे सवलत मिळत असून ती लवकरच एक रुपया होण्याची शक्यता आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 13, 2026 | 03:23 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीज वापरल्यास ८५ पैशांची सवलत
  • ऑक्टोबरमध्ये ५ लाख ग्राहकांना १.४४ कोटींचा लाभ
  • स्मार्ट मीटर पूर्णपणे मोफत; मोबाईलवरही पाहता येणार वीज वापर
Nagpur News : महागाईच्या वाढत्या काळात वीजबिलाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील घरगुती वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महावितरणच्या स्मार्ट टीओडी (Time of Day) मीटरमुळे या दोन्ही जिल्ह्यांतील ग्राहकांनी अवघ्या सात महिन्यांत तब्बल १०.३७ कोटी रुपयांहून अधिक बचत केली आहे. विशेष म्हणजे, विजेचा वापर योग्य वेळेत केल्यास ग्राहकांना थेट वीजबिलात सवलत मिळत आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरचा वापर आणि त्यातून मिळणाऱ्या आर्थिक फायद्यांकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे.

सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीज वापरल्यास ८५ पैशांची सवलत

महावितरणकडून स्मार्ट टीओडी मीटरधारक घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरासाठी प्रति युनिट ८५ पैसे सवलत दिली जात आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत नागपूर जिल्ह्यातील ग्राहकांनी ८.८६ कोटी रुपयांची बचत केली आहे.

तर वर्धा जिल्ह्यातील ग्राहकांना १.५१ कोटी रुपयांचा आर्थिक फायदा झाला आहे. दोन्ही जिल्ह्यांतील एकूण बचतीचा आकडा १०.३७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या सवलतीचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांची संख्या दरमहा वाढत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

Nagpur News : १४.१३ कोटींचा प्रकल्प अमृत २.० मधून वगळण्याची मनपाची तयारी; अतिक्रमणांमुळे लेंडी तलावाच्या पुनरुज्जीवनाला खीळ

ऑक्टोबरमध्ये ५ लाख ग्राहकांना १.४४ कोटींचा लाभ

स्मार्ट टीओडी मीटरमुळे मिळणाऱ्या सवलतीचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला जात असल्याचे ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारीवरून स्पष्ट होते. केवळ एका महिन्यात नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांतील ५ लाख १ हजार ५७२ ग्राहकांना एकूण १.४४ कोटी रुपयांची सवलत मिळाली आहे.

महावितरणचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटणकर यांनी ही माहिती दिली. दरम्यान, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार सध्या मिळणारी प्रति युनिट ८५ पैशांची सवलत नजीकच्या भविष्यात एक रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी आर्थिक फायदा मिळू शकतो.

Nagpur News : स्वच्छता सर्वेक्षणात नागपूरला पुन्हा टॉप-३ मध्ये स्थान नाही; यंदा २२ व्या क्रमांकावरून सुधारणा की घसरण?

स्मार्ट मीटर पूर्णपणे मोफत; मोबाईलवरही पाहता येणार वीज वापर

स्मार्ट मीटरबाबत काही भागांत गैरसमज पसरवून विरोध करण्यात आला होता. मात्र, या मीटरमुळे होणारी बचत समोर आल्यानंतर ग्राहकांचा दृष्टिकोन बदलत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी ग्राहकांना स्मार्ट मीटरबाबत वस्तुस्थिती समजून घेण्याचे आवाहन केले आहे. स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणकडून कोणतेही शुल्क आकारले जात नसून ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.

याशिवाय महावितरणच्या मोबाईल अॅपवर ग्राहकांना तासानुसार आणि दिवसानुसार वीज वापराची माहिती पाहता येते. त्यामुळे कोणत्या वेळी किती वीज खर्च होते, हे समजून घेऊन ग्राहकांना आपल्या वापराचे नियोजन करता येणार आहे. आगामी काळात प्रति युनिट एक रुपयांची सवलत लागू झाल्यास स्मार्ट मीटरचा फायदा आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Nagpur smart meter electricity bill 10 crore savings 85 paise discount cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Electricity Bill
  • Marathi News
  • Nagpur News
  • smart meter

संबंधित बातम्या

Chandrapur News: दिवाळी संपली, आता निवडणुका कधी? इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू, ग्रामीण भागात चर्चांना वेग
1

Chandrapur News: दिवाळी संपली, आता निवडणुका कधी? इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू, ग्रामीण भागात चर्चांना वेग

Nagpur News : १४.१३ कोटींचा प्रकल्प अमृत २.० मधून वगळण्याची मनपाची तयारी; अतिक्रमणांमुळे लेंडी तलावाच्या पुनरुज्जीवनाला खीळ
2

Nagpur News : १४.१३ कोटींचा प्रकल्प अमृत २.० मधून वगळण्याची मनपाची तयारी; अतिक्रमणांमुळे लेंडी तलावाच्या पुनरुज्जीवनाला खीळ

सांगलीतील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची दुरवस्था; रंगमंचापासून स्वच्छतागृहापर्यंत सगळेच खराब
3

सांगलीतील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची दुरवस्था; रंगमंचापासून स्वच्छतागृहापर्यंत सगळेच खराब

Chandrapur News: चिमूरच्या फुटपाथवर विद्युत खांबांचा अडथळा; अपघाताचा धोका वाढला, महावितरण आणि PWD च्या कारभारावर प्रश्नचिन्ह
4

Chandrapur News: चिमूरच्या फुटपाथवर विद्युत खांबांचा अडथळा; अपघाताचा धोका वाढला, महावितरण आणि PWD च्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.