Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : १४.१३ कोटींचा प्रकल्प अमृत २.० मधून वगळण्याची मनपाची तयारी; अतिक्रमणांमुळे लेंडी तलावाच्या पुनरुज्जीवनाला खीळ

Nagpur News : नागपूरच्या ऐतिहासिक लेंडी तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी १४.१३ कोटींचा निधी मंजूर झाला; मात्र १८४ अतिक्रमणधारक, सांडपाण्याची समस्या आणि रस्त्याअभावी काम ठप्प आहे. त्यामुळे प्रकल्प अमृत २.० मधून वगळण्याची विनंती मनपाने राज्य सरकारकडे केली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 13, 2026 | 02:59 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • अतिक्रमणांचा विळखा; १८४ नागरिकांना नोटिसा
  • २८.५ एकरांचा तलाव उरला केवळ १२ एकरांवर
  • सांडपाण्याची समस्या; प्रकल्प वगळण्याची मनपाची विनंती
Nagpur News : नागपूर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या ऐतिहासिक लेंडी तलावाच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तलावाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या अमृत २.० योजनेतून १४.१३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असतानाही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.

अतिक्रमणे, सांडपाण्याची समस्या आणि कामासाठी आवश्यक मार्ग उपलब्ध नसल्याने प्रकल्प रखडला आहे. अखेर हा प्रकल्प योजनेतून वगळण्याची विनंती करणारे पत्र महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवले आहे.

अतिक्रमणांचा विळखा; १८४ नागरिकांना नोटिसा

लेंडी तलाव आणि त्याच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या १८४ नागरिकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, अद्याप अतिक्रमणे हटवण्यात आलेली नाहीत. त्यामुळे तलावातील पाणी बाहेर काढणे, साचलेला गाळ उपसणे आणि विकासकामांसाठी आवश्यक यंत्रसामग्री घटनास्थळी पोहोचवणे प्रशासनाला शक्य होत नाही. परिणामी, मंजूर निधी असूनही प्रकल्पाची प्रगती शून्य टक्क्यांवर आहे.

Nagpur News : स्वच्छता सर्वेक्षणात नागपूरला पुन्हा टॉप-३ मध्ये स्थान नाही; यंदा २२ व्या क्रमांकावरून सुधारणा की घसरण?

२८.५ एकरांचा तलाव उरला केवळ १२ एकरांवर

लेंडी तलावाचे मूळ क्षेत्रफळ २८.५ एकर होते. मात्र, कालांतराने तलावाच्या ६७ हजार ४९० चौरस मीटर म्हणजेच १६.६७ एकर जागेवर अतिक्रमण झाल्याचे कॅगच्या २०१९ मधील अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे तलावासाठी प्रत्यक्षात केवळ ११.८३ एकर क्षेत्र शिल्लक राहिले.

ऑक्टोबर २०२१ मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही तलावाचा जलविस्तार सुमारे १२ एकर असल्याची माहिती देण्यात आली होती. विशेष म्हणजे, अमृत २.० अंतर्गत मंजूर विकासकामे केवळ ६.४२ एकर क्षेत्रापुरती मर्यादित होती.

Nagpur News : तोतलाडोह धरणात केवळ २५.३३ टक्के जलसाठा; चोरट्यांचा पाण्यावर डल्ला; नदी, कालव्यांमधील पाणी टँकरने विक्री

सांडपाण्याची समस्या; प्रकल्प वगळण्याची मनपाची विनंती

तलाव परिसरातील ४० ते ४२ घरांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट तलावात मिसळत आहे. अपेक्षेपेक्षा अधिक सांडपाणी तलावात येत असल्याने पुनरुज्जीवनाचे काम पुढे नेणे कठीण झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते रवी पराते यांनी राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे तलावाचा विकास रखडल्याचा आरोप केला आहे.

तर नगरसेवक हेमंत बरडे यांनी सौंदर्यीकरणासाठी अतिक्रमणे हटवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. अतिक्रमणांचा विषय जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित असल्याने आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. १४.१३ कोटींचा निधी मंजूर असूनही ऐतिहासिक तलावाच्या पुनरुज्जीवनाऐवजी प्रकल्पच योजनेतून वगळण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Nagpur lendi lake project stalled cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • lake
  • Marathi News
  • Nagpur Municipal Corporation
  • Nagpur News

संबंधित बातम्या

सांगलीतील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची दुरवस्था; रंगमंचापासून स्वच्छतागृहापर्यंत सगळेच खराब
1

सांगलीतील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची दुरवस्था; रंगमंचापासून स्वच्छतागृहापर्यंत सगळेच खराब

Chandrapur News: चिमूरच्या फुटपाथवर विद्युत खांबांचा अडथळा; अपघाताचा धोका वाढला, महावितरण आणि PWD च्या कारभारावर प्रश्नचिन्ह
2

Chandrapur News: चिमूरच्या फुटपाथवर विद्युत खांबांचा अडथळा; अपघाताचा धोका वाढला, महावितरण आणि PWD च्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Jalgaon News: सणांचा उत्साह अन् बसस्थानक हाऊसफुल्ल! एरंडोल आगाराची 10 लाखांच्या कमाईकडे झेप
3

Jalgaon News: सणांचा उत्साह अन् बसस्थानक हाऊसफुल्ल! एरंडोल आगाराची 10 लाखांच्या कमाईकडे झेप

Raigad News: कर्जतमधील ८४ एकर सरकारी जमिनीचा वाद पेटला! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, संपादन कारवाई केली रद्द
4

Raigad News: कर्जतमधील ८४ एकर सरकारी जमिनीचा वाद पेटला! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, संपादन कारवाई केली रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.