Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील प्रकरणांची महालेखापाल चौकशी; महसूलमंत्री बावनकुळेंची महत्त्वपूर्ण घोषणा

नवी मुंबईत वरिष्ठ लिपिकाने मुद्रांक अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर १० दिवसांत ८०० पेक्षा जास्त दस्तांची नोंदणी केल्याची बाब समोर आली आहे. यामुळे शासनाचा १३.९९ कोटींचा महसूल बुडाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 26, 2026 | 08:43 AM
'सरकार लवकरच डिजिटल प्रॉपर्टी कार्ड जारी करणार'; महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

'सरकार लवकरच डिजिटल प्रॉपर्टी कार्ड जारी करणार'; महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Follow Us
Follow Us:

मुंबई : नवी मुंबईत अनधिकृत इमारतींमधील दस्तांची बेकायदा नोंदणी करून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्याला केवळ निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. तसेच, मुद्रांक शुल्कातील अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२६ काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची ‘महालेखापाल’ यांच्या विशेष कृती दलामार्फत सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा विषय उपस्थित केला. त्यावर महसूलमंत्र्यांनी ही माहिती दिली. नवी मुंबईत वरिष्ठ लिपिकाने मुद्रांक अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर १० दिवसांत ८०० पेक्षा जास्त दस्तांची नोंदणी केल्याची बाब समोर आली आहे. यामुळे शासनाचा १३.९९ कोटींचा महसूल बुडाला आहे. बिल्डरांशी संगनमत करून नियोजनबद्ध पद्धतीने केलेला हा स्कॅम आहे. अशा अधिकाऱ्याला कायदेशीर बाबी तपासून कायमचे बडतर्फ करण्याच्या दिशेने शासन पावले उचलत आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

अधिकाऱ्यांसाठी SOP; दोषींविरुद्ध फौजदारी गुन्हे

अर्धन्यायिक अधिकार पूर्णपणे न्यायिक अधिकार नाहीत, त्यामुळे अधिकाऱ्यांनी ‘स्टॅम्प अॅक्ट’च्या मर्यादेतच राहून काम करणे बंधनकारक आहे. यापुढे अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासन मार्गदर्शक तत्त्वे आणि शासन निर्णय काढत आहे. यापुढे ‘अॅडज्युडीकेशन’ करताना कोणत्याही अधिकाऱ्याने नियमांच्या बाहेर जाऊन काम केल्यास तो थेट फौजदारी गुन्ह्यास पात्र ठरेल, असा दम महसूलमंत्र्यांनी दिला आहे.

10 ते 20 हजार कोटींचा घोटाळा

राज्यभर होणाऱ्या चौकशीतून १० ते २० हजार कोटी रुपयांचा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक प्रकरणांत अधिकारी ‘अॅडज्युडीकेशन’च्या नावे आधी मुद्रांक शुल्क जास्त लावणे व नंतर कमी करण्याचे गैरप्रकार करतात. राज्यव्यापी चौकशी महालेखापालांमार्फत होईल. एजींकडे कामाचा ताण असल्याने तपासासाठी ‘टास्क फोर्स’ असेल. निधी, मनुष्यबळ सरकार पुरवेल. १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२६ काळात राज्यातील सर्व ‘अॅडज्युडीकेशन’ प्रकरणांची तपासणी केली जाईल.

वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड; प्रांत अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आलं निवडीचं पत्र

Web Title: Accountant general to probe state cases revenue minister bawankule makes significant announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 08:43 AM

Topics:  

  • chandrashekhar bawankule

संबंधित बातम्या

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ
1

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ

‘जो गद्दारी करेल तो मराठा जातीचा नाही’; आटपाडीच्या सभेत मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
2

‘जो गद्दारी करेल तो मराठा जातीचा नाही’; आटपाडीच्या सभेत मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.