Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जो गद्दारी करेल तो मराठा जातीचा नाही’; आटपाडीच्या सभेत मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची आटपाडीमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर गंभीर आरोप करत गद्दारी करणाऱ्यांनाही इशारा दिला.

  • By विवेक
Updated On: Aug 10, 2026 | 03:32 PM
manoj jarange patil maratha reservation

manoj jarange patil maratha reservation

Follow Us
Follow Us:
  • मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर एकजूट राहण्याचं जरांगे पाटलांचं आवाहन
  • ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा करत सरकारवर कट रचल्याचा आरोप
  • देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत चूक केल्यास सोडणार नसल्याचा इशारा
 

सांगली : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगली जिल्ह्यात त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून आटपाडी येथे त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेपूर्वी जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. औक्षण केल्यानंतर व्यासपीठाकडे जाताना त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली.

यावेळी झालेल्या भाषणात जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या एकजुटीचा मुद्दा उपस्थित करत आरक्षणाच्या मागणीवरून सरकारवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर समाजाच्या भूमिकेविरोधात जाणाऱ्यांवरही त्यांनी आक्रमक शब्दांत भाष्य केलं.

‘समाजावर अन्याय झाला की तुटून पडायचं’

आटपाडीच्या सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या एकजुटीचं कौतुक केलं. राजकारणामुळे भावकीत आणि वेगवेगळ्या गटांत विभागलेला समाज आता एका मुद्द्यावर एकत्र येत असल्याचं त्यांनी म्हटलं. “समाजावर अन्याय झाला की तुटून पडायचं. आपल्या अनेक पिढ्या पक्षाला बाप मानण्यात गेल्या. समाजाला आता हे कळत आहे,” असं ते म्हणाले.

Maratha Reservation Breaking Update: मराठा आरक्षण सुनावणी पुन्हा रखडणार? न्यायमूर्ती घुगेंच्या पदोन्नतीमुळे पेच वाढणार

मराठा आरक्षण हाच आपला एकमेव ध्यास असल्याचं सांगत गेल्या तीन वर्षांपासून आपण समाजाच्या प्रश्नासाठी काम करत असल्याचंही जरांगे पाटील यांनी नमूद केलं.

‘जो गद्दारी करेल तो मराठा जातीचा नाही’

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजाशी गद्दारी करणाऱ्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली. आरक्षणाच्या मागणीपासून आपण बाजूला झालो नसल्याचं सांगत समाजहिताच्या भूमिकेतून काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. सरकारने कुणबी नोंदींच्या मुद्द्यावर अचानक भूमिका बदलल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर कट रचल्याचा आरोप केला. देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी थेट निशाणा साधला.

‘५८ लाख नोंदी सापडल्या’

कुणबी नोंदींच्या मुद्द्यावर भाष्य करताना जरांगे पाटील यांनी शिंदे समितीच्या कामाचा उल्लेख केला. “५८ लाख नोंदी सापडल्या,” असा दावा त्यांनी केला. या नोंदींच्या आधारे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली. सरकारने या प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.

चंद्रशेखर बावनकुळेंवरही टीका

जरांगे पाटील यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीका केली. मराठा समाजाच्या प्रश्नावर पुरेसे मराठा नेते बोलत नसल्याचा दावा करत त्यांनी बावनकुळे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या काळात मराठा समाजाकडे मतांसाठी पाहिलं जातं, मात्र समाजाच्या प्रश्नांवर भूमिका घेतली जात नसल्याची टीकाही त्यांनी केली.

मनोज जरांगेंच्या ‘आमदार पाडू’च्या इशाऱ्यावर प्रवीण दरेकरांचं थेट चॅलेंज; म्हणाले, ‘उमेदवार उभे करा, क्षमता सिद्ध करा’

‘फडणवीस तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही’

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील यांनी आक्रमक इशारा दिला. “फडणवीस तुम्हाला जिंदगीमध्ये यशस्वी होऊ देणार नाही,” असं ते म्हणाले. चूक केली तर सोडणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. तसंच एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. समाजाच्या प्रश्नांच्या आड कोणीही आलं तर त्याला मोजणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

आटपाडीच्या सभेतून जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका मांडली. पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या पुढील टप्प्यांत त्यांच्या भूमिकेकडे आणि सरकारकडून त्यावर काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Manoj jarange patil atpadi sabha maratha reservation devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • CM Devendra Fadnavis
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
1

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
2

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना
3

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश
4

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.