Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ

kalyan News: कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरातील एका जमिनीच्या सातबाऱ्यावर फेरफार करून अवघ्या एका तासात दुसऱ्या व्यक्तीचे नाव नोंदवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपा पदाधिकारी व विकासक प्रेमनाथ म्हात्रे यांनी या प्रकरणावर आक्षेप घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्याचे जाहीर.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 13, 2026 | 03:36 PM
अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ

अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ

Follow Us
Follow Us:
  • फेरफार करून तासाभरात सातबाऱ्यावर दुसरे नाव
  • प्रेमनाथ म्हात्रे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार
  • सातबारा फेरफार प्रकरणी कल्याण तहसील कार्यालयावर प्रश्नचिन्ह
  • उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा
kalyan News Marathi: कल्याण पश्चिमेतील बारवे परिसरातील एका जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर अवघ्या एका तासात दुसऱ्या व्यक्तीचे नाव नोंदवल्याचा आरोप करण्यात आला आहे. फेरफार प्रक्रिया इतक्या कमी वेळेत कशी झाली, असा सवाल उपस्थित झाल्याने कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपा पदाधिकारी आणि विकासक प्रेमनाथ म्हात्रे यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, बारवे परिसरातील संबंधित जमीन एका शेतकऱ्याच्या नावावर होती. ६ ऑगस्ट रोजी या जमिनीच्या फेरफार नोंदीमध्ये बदल करण्यात आल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यासोबत त्याच्या एका महिला नातेवाईकाचे नावही फेरफार नोंदीत समाविष्ट करण्यात आले आणि त्यानंतर सातबारा उताऱ्यावरही तिचे नाव नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या एका तासात झाल्याचा दावा करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

Kalyan: ‘दृश्यम’ स्टाईल प्रियकराची हत्या, फ्लॅटमध्ये सडलेला मृतदेह अन् घरमालकाला दिला व्हॉईस मेसेज

प्रेमनाथ म्हात्रे यांचे गंभीर आरोप

या प्रकरणावर बोलताना प्रेमनाथ म्हात्रे यांनी कल्याण तहसीलदार विकास गरुडकर यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाबाबत तहसीलदारांकडे विचारणा केली असता आपल्यावर एका मोठ्या राजकीय नेत्याचा दबाव असल्याचे सांगण्यात आले, असा दावा म्हात्रे यांनी केला आहे. मात्र, हा दावा संबंधित तहसीलदारांनी अधिकृतरीत्या मान्य केला आहे, असे सध्या स्पष्ट झालेले नाही.

म्हात्रे यांनी महसूल विभागाच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करताना, सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनीच्या फेरफारासाठी साधारणपणे प्रक्रिया आणि हरकतीसाठी वेळ दिला जात असताना या प्रकरणात कोणतीही माहिती न देता तासाभरात प्रक्रिया कशी पूर्ण झाली? असा सवाल केला आहे.

मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्र्यांची भेट घेणार

या प्रकरणाची तक्रार घेऊन आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घेणार असल्याचे प्रेमनाथ म्हात्रे यांनी सांगितले आहे. सत्ताधारी पक्षाशी संबंधित असतानाही आपल्यासोबत असा प्रकार होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करताना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचेही म्हात्रे यांनी सांगितले आहे. याशिवाय, खोट्या कागदपत्रांच्या माध्यमातून विकासक आणि शेतकऱ्यांना ब्लॅकमेल करणारी टोळी कल्याणमध्ये सक्रिय असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशाच प्रकारच्या घटना आणखी काही व्यक्तींसोबत घडल्याची माहिती असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

तहसीलदार काय म्हणाले?

दरम्यान, या आरोपांबाबत कल्याण तहसीलदार विकास गरुडकर यांनी आपल्याला या प्रकरणाची संपूर्ण माहिती नसल्याचे सांगितले आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील माहिती दिली जाईल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता सातबारा फेरफाराची प्रक्रिया नेमकी कोणत्या नियमांनुसार आणि कोणत्या कागदपत्रांच्या आधारे करण्यात आली, तसेच अवघ्या एका तासात ही नोंद कशी झाली, याचा तपास झाल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके सत्य समोर येणार आहे.

Ramesh Mhatre Arrest: महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेंना अटक

Web Title: Kalyan talathi office 7 12 land record name change in one hour premnath mhatre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • devendra fadnavis
  • kalyan

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
2

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप
3

KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
4

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.