Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र बँकेच्या वसुली एजंट खून प्रकरणी १८ तासांच्या आत एका आपरोपीला अटक; दौंड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पुण्यातील महाराष्ट्र बँकेच्या वसुली एजंटचा धारधार हत्याराने भोकसून खून केल्याप्रकरणी दौंड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका संशयित आरोपीला अटक करून ताब्यात घेतले आहे,ही माहिती दौंड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.. 

  • By प्रीति माने
Updated On: Mar 03, 2024 | 05:50 PM
महाराष्ट्र बँकेच्या वसुली एजंट खून प्रकरणी १८ तासांच्या आत एका आपरोपीला अटक;  दौंड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Follow Us
Close
Follow Us:
पाटस :  जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर पुण्यातील महाराष्ट्र बँकेच्या वसुली एजंटचा धारधार हत्याराने भोकसून खून केल्याप्रकरणी दौंड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका संशयित आरोपीला अटक करून ताब्यात घेतले आहे,ही माहिती दौंड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
दिपक रामदास लोंढे (वय-३७ वर्षे रा.वासुंदे ता. दौंड) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे येथील प्रवीण मळेकर (वय-५८) हे बँकेत रिकव्हरीचे काम करत होते. शुक्रवारी (दि.१) रोजी रात्री मोटारसायकलवरून बारामतीहून घरी येथे जात असताना दौंड तालुक्यातील वासुंदे जवळ एका अज्ञाताने धारदार हत्याराने भोकसून त्यांचा खून केल्याची घटना घडली होती. याबाबत मृत प्रवीण मळेकर यांचा  मुलगा ऋषिकेश मळेकर यांनी दौंड पोलिसात दिली होती.त्यांच्या फिर्यादीवरन दौंड पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
घटनेची माहिती मिळताच क्षणांचा विलंब न करता दौंड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाची पाहणी केली होती. पोलीस निरीक्षक यादव यांनी तात्काळ आरोपीच्या शोध मोहिमेसाठी एक पोलीस निरीक्षक तीन पोलीस उपनिरीक्षक आणि १५ पोलीस कर्मचाऱ्यांची पथके तैनात केली होती. अवघ्या १८ तासाच्या आत आरोपीला पकडण्यात पोलीसांना यश आले. दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासा संदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या.
 अशाप्रकारे करण्यात आला तपास 
या खुनाचा सखोल तपास करताना पोलीसांनी त्या रस्त्यावर संशयित वाहनांची तपासणी केली, अनेकांशी विचारपूस केली. सीसीटीव्ही फुटेज चेक केले. यावेळी तपासात त्या परिसरातच राहणाऱ्या एका इसमाकडून वारंवार वाहनांवर दगडफेक तसेच हुज्जत घालण्याचे प्रकार होत असल्याची माहिती मिळाली. घटनेचा सूक्ष्म तपास करताना पोलीसांनी श्वानपथक बोलावून आरोपीचा माग काढला. या अगोदरही दगड मारणे, शिवीगाळ करणे असे प्रकार संबंधित आरोपी करत होता. काही तासांपूर्वीही आरोपीने गाडीवर दगड मारले होते. मागील एका गुन्ह्यात महिलेला आरोपीने धारदार हत्याराचा धमकी साठी वापर केला असल्याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या कारणामुळे केला खून 
रस्त्याने जाणाऱ्या वाहनांमुळे मला त्रास होतो.जाणून-बुजून माझ्या अंगावर वाहने घालतात,असे सांगणाऱ्या एका आरोपीने त्रास होतोय या कारणावरून रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीस्वारासोबत वाद घालून हातातील धारदार सुरा मारला असून या घटनेत त्याचा जीव गेला आहे. घटनेचा शोध लावत दौंड पोलिसांनी आरोपी दिपक लोंढे याला गुन्हा दाखल करून जेरबंद केले आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल गावडे, अरविंद गटकुळ,तुकाराम राठोड, सहाय्यक फौजदार श्रीरंग शिंदे, शंकर वाघमारे, सुभाष राऊत, पांडुरंग थोरात, सागर म्हेत्रे, नितीन बोराडे, रवी काळे, अमीर शेख, संजय नगरे, अमोल देवकाते, शरद वारे, योगेश गोलांडे, महेश भोसले, किरण पांढरे, पोलीस जवान असिफ शेख, मंगेश ठिगळे, विजय कांचन, धिरज जाधव आदींनी ही कामगिरी केली.

Web Title: Accused arrested within 18 hours in case of murder of maharashtra banks recovery agent action by daund police nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2024 | 05:50 PM

Topics:  

  • crime news
  • daund crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Mumbai Amdabad Crime : मुंबई-अहमदाबाद मार्गावर ड्रग्सचा कारखाना, १४ कोटींचा मुद्देमाल जप्त
1

Mumbai Amdabad Crime : मुंबई-अहमदाबाद मार्गावर ड्रग्सचा कारखाना, १४ कोटींचा मुद्देमाल जप्त

खळबळजनक ! जन्मदात्या मुलीवर बापानेच केला अत्याचार; शस्त्राचा धाक दाखवला अन्…
2

खळबळजनक ! जन्मदात्या मुलीवर बापानेच केला अत्याचार; शस्त्राचा धाक दाखवला अन्…

धक्कादायक! पोरानेच केला बापाचा ‘सायबर गेम’! लावला ‘इतक्या’ लाखाचा चुना; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3

धक्कादायक! पोरानेच केला बापाचा ‘सायबर गेम’! लावला ‘इतक्या’ लाखाचा चुना; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

शिक्रापुरातील लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलीस तेथे पोहचले अन्…
4

शिक्रापुरातील लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलीस तेथे पोहचले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.