Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेजुरीतील महेबुब पानसरेंच्या खून प्रकरणातील आरोपींना अटक, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई; काही तासांत आरोपी जाळ्यात

राष्ट्रवादीच्या नेत्या नेत्या तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी नगरसेवक महेबुब पानसरे यांच्या खून प्रकरणातील दोन आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. त्यांना डेक्कन भागातून पकडण्यात आले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 09, 2023 | 02:56 PM
जेजुरीतील महेबुब पानसरेंच्या खून प्रकरणातील आरोपींना अटक, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई; काही तासांत आरोपी जाळ्यात
Follow Us
Follow Us:

पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्या नेत्या तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी नगरसेवक महेबुब पानसरे यांच्या खून प्रकरणातील दोन आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. त्यांना डेक्कन भागातून पकडण्यात आले. खंडणी विरोधी पथक दोनने त्यांना घटनेनंतर काही तासांत पकडण्यात यश आले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे व सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांनी दिली.

जमिनीच्या वादातून त्यांची निर्घुन हत्या झाली असल्याचे समोर आले आहे. वनीस प्रल्हाद परदेशी (रा. गुरूवार पेठ, पुणे. मुळ रा. बेंदवस्ती, जेजुरी) आणि महादेव विठ्ठल गुरव उर्फ काका परदेशी (वय ६५, रा. ढालेवाडी, बेंद वस्ती, जेजुरी, पुणे. मुळ रा. वाजेगाव, ता. फलटण, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

जेजुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार शंकर संपते, सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे, सैदोबा भोजराव, चेतन आपटे, प्रदिप गाडे आणि पवन भोसले यांच्या पथकाने केली आहे.

जेजुरीतील महेबुब सय्यदलाल पानसरे हे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय मानले जात होते. पानसरे यांचा जमीनीच्या वादातून शुक्रवारी सायंकाळी बेंदवस्ती येथे डोक्यात कुर्‍हाड व कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. यावेळी साजिद युनुस मुलाणी आणि राजु फिरोज पानसरे हे जखमी झाले होते. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा नोंद केला होता.

दरम्यान, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेतला जात होता. यादरम्यान, पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरात गुन्हे शाखेतर्फे कॉम्बिंग ऑपरेशन राबविले जात होते. यावेळी सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांना पानसरे यांच्या खूनातील वनीस आणि महादेव हे डेक्कन परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, दोन वेगवेगळी पथकांनी डेक्कन परिसरात शोध मोहिम सुरू केली. काही तासांत त्यांना डेक्कन परिसरातून पकडले. त्यांना पुढील कारवाईसाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Accused in jejuri mahebub pansares murder case arrested pune police crime branch action within a few hours the accused was in the net nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2023 | 02:55 PM

Topics:  

  • DCM Devendra Fadanvis
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
1

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Hinjawadi IT Park Pune Road: चाकणनंतर आता हिंजवडीत खराब रस्ते अन् वाहतूक कोंडी आयटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
2

Hinjawadi IT Park Pune Road: चाकणनंतर आता हिंजवडीत खराब रस्ते अन् वाहतूक कोंडी आयटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक
3

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक

Navi Mumbai News: पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल
4

Navi Mumbai News: पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.