Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचे आयुक्तांना पत्र

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना भाजपचे नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी पत्र लिहून अतिक्रमणावर सुरु असलेल्या कारवाईबद्दल अभिनंदन केले आहे. अतिक्रमण होऊच नये यासाठी रोजच्या देखरेखीवर भर द्यावा लागेल, असंही साळेगावकर यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 21, 2026 | 02:55 PM
अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचे आयुक्तांना पत्र

अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचे आयुक्तांना पत्र

Follow Us
Follow Us:
  • पुणे महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईचे भाजप नगरसेवकाकडून स्वागत.
  • क्षेत्रीय अधिकारी आणि अतिक्रमण निरीक्षकांवरही कारवाईची मागणी
  • अधिकाऱ्यांची नावेही जाहीर करण्याची रवींद्र साळेगावकरांची मागणी
पुणे : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना भाजपचे नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी पत्र लिहून अतिक्रमणावर सुरु असलेल्या कारवाईबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच अतिक्रमणाच्या विषयात फोन करणाऱ्या नगरसेवकांची नावे जाहीर करण्याच्या निर्णयाचेही त्यांनी स्वागत केले आहे. शहरात अतिक्रमणाविरोधात सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे, असं साळेगावकर यांनी सांगितलं.

 

रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे महापालिकेने घेतलेली कठोर भूमिका योग्य असल्याचे रवींद्र साळेगावकर यांनी पत्रात म्हटले आहे. मात्र केवळ नगरसेवकांवर नजर ठेवून अतिक्रमण थांबणार नाही, तर त्यासाठी जबाबदार असलेल्या क्षेत्रीय अधिकारी आणि अतिक्रमण निरीक्षक यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

साळेगावकर यांच्या मते, क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत काम करणारे अतिक्रमण निरीक्षक दररोज रस्त्यावर फिरत असतात. त्यांच्या भागात कुठे अतिक्रमण झाले आहे, कुठे नवीन बांधकाम सुरू आहे, याची त्यांना पूर्ण माहिती असते. तरीही अनेक ठिकाणी ते डोळेझाक करतात. त्यामुळे अतिक्रमण वाढत जाते आणि नंतर कारवाई करणे अधिक कठीण होते. ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक अतिक्रमण आढळेल, त्या कार्यालयातील संबंधित अधिकारी आणि निरीक्षक यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होईल आणि अतिक्रमणाला आळा बसेल.

हे सुद्धा वाचा  : बाणेरमधील दोन मेट्रो स्थानके डिसेंबरमध्ये प्रवाशांच्या सेवेत? सीएमआरएसच्या सुरक्षा तपासणीनंतरच अंतिम मुहूर्त

नगरसेवकांच्या फोनची यादी जाहीर करण्यासोबतच अधिकाऱ्यांचीही यादी जाहीर करावी, अशी मागणी साळेगावकर यांनी केली आहे. पारदर्शकता आल्यास अतिक्रमण करणाऱ्यांना पाठबळ मिळणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. केवळ कारवाई करून उपयोग नाही, तर अतिक्रमण होऊच नये यासाठी रोजच्या देखरेखीवर भर द्यावा लागेल, असंही साळेगावकर यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे महापालिकेच्या आयुक्तांना पत्र कोणी लिहिले आहे?

    Ans: भाजपचे नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी पुणे महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

  • Que: रवींद्र साळेगावकर यांनी पत्रातून कोणती मागणी केली आहे?

    Ans: अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या क्षेत्रीय अधिकारी आणि अतिक्रमण निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

  • Que: नगरसेवकांनी कोणत्या निर्णयाचे स्वागत केले आहे?

    Ans: अतिक्रमणाच्या कारवाईसंदर्भात फोन करणाऱ्या नगरसेवकांची नावे जाहीर करण्याच्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे.

Web Title: Bjp corporator ravindra salegaonkar has welcomed the ongoing action against encroachments nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

धक्कादायक ! UPSC क्लासेसच्या तक्रारी मागे घेण्यासाठी 10 लाखांची खंडणी; पुण्यातील विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल
1

धक्कादायक ! UPSC क्लासेसच्या तक्रारी मागे घेण्यासाठी 10 लाखांची खंडणी; पुण्यातील विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Amravati Crime : अमरावतीत दरोड्याचा मोठा डाव उधळला; सात जणांना पोलिसांनी पकडले
2

Amravati Crime : अमरावतीत दरोड्याचा मोठा डाव उधळला; सात जणांना पोलिसांनी पकडले

Tata Dam Project: धरणाच्या ब्लास्टिंगमुळे घरांना तडे, ग्रामस्थांच्या जीवाला धोका; तापकीरवाडीत महिला-विद्यार्थ्यावर दगडांचा मारा
3

Tata Dam Project: धरणाच्या ब्लास्टिंगमुळे घरांना तडे, ग्रामस्थांच्या जीवाला धोका; तापकीरवाडीत महिला-विद्यार्थ्यावर दगडांचा मारा

देवघराच्या खिडकीतून घरात प्रवेश, सोनं-रोकड लंपास; दहा दिवसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या
4

देवघराच्या खिडकीतून घरात प्रवेश, सोनं-रोकड लंपास; दहा दिवसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.