Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवर आता कारवाईचा बडगा ;  उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

नॅक-नॅब मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवर आता थेट कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना नोटिस द्यावी. दिलेल्या कालमर्यादेत प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महाविद्यालयांचे पुढील काळात नवीन प्रवेश थांबविणे, प्रवेश संख्या कमी, मर्यादित करणे, तसेच त्यांची परीक्षा केंद्रे रद्द करणे अशी कारवाई करण्याबाबत पाटील स्पष्ट केले.

  • By Aparna
Updated On: Sep 10, 2023 | 06:10 PM
मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवर आता कारवाईचा बडगा ;  उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : नॅक-नॅब मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवर आता थेट कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना नोटिस द्यावी. दिलेल्या कालमर्यादेत प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महाविद्यालयांचे पुढील काळात नवीन प्रवेश थांबविणे, प्रवेश संख्या कमी, मर्यादित करणे, तसेच त्यांची परीक्षा केंद्रे रद्द करणे अशी कारवाई करण्याबाबत पाटील स्पष्ट केले. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागीय सहसंचालक यांची आढावा बैठक महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, विभागीय सह संचालक आदी उपस्थित होते. विद्यापीठनिहाय संलग्न महाविद्यालये, त्यापैकी नॅक मानांकन प्राप्त महाविद्यालये यांची माहिती व आढावा घेण्यात आला.

राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने सर्व महाविद्यालयांच्या नॅक मूल्यांकनासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा. नॅक मूल्यांकनासाठी नोंदणी केलेल्या, मूल्यांकन प्राप्त आणि मूल्यांकन नसलेल्या महाविद्यालयांची माहिती, नावे विद्यापीठांनी संकेतस्थळावर अद्ययावत करून प्रसिद्ध करावी, तंत्रशिक्षण, औषधनिर्माणशास्त्राचे पदविका शिक्षण देणाऱ्या संस्थांनी राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळाकडून (एनबीए) मूल्यांकन करून घेणे आवश्यक असून त्यासाठी तंत्रशिक्षण विभागाने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही पाटील यांनी दिल्या.

-आकडेवारी
अनुदानित महाविद्यालये – १ हजार १७७
नॅक मूल्यांकन पूर्ण महाविद्यालये – १ हजार ११३
विनाअनुदानित महाविद्यालये – २ हजार १४१
नॅक मूल्यांकन असलेली विनाअनुदानित महाविद्यालये – २५७
एकूण शासकीय महाविद्यालये – २८
नॅक मूल्यांकन झालेली शासकीय महाविद्यालये – २४
‘ए’, ‘ए+’, ‘ए ++’ नॅक श्रेणीप्राप्त महाविद्यालये – २०२

Web Title: Action now on non assessed colleges instructions of higher and technical education minister chandrakant patil nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2023 | 06:10 PM

Topics:  

  • chandraknt patil
  • maharashtra
  • maharashtra news
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Karjat News: कर्जतमध्ये पुन्हा हेलिकॉप्टरची हवाई सफर, हेलिकॉप्टर वारीला प्रशासनाचा आशीर्वाद?
1

Karjat News: कर्जतमध्ये पुन्हा हेलिकॉप्टरची हवाई सफर, हेलिकॉप्टर वारीला प्रशासनाचा आशीर्वाद?

धाराशिव जलसंधारण विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार, हिवाळी अधिवेशनात याला वाचा फुटणार?
2

धाराशिव जलसंधारण विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार, हिवाळी अधिवेशनात याला वाचा फुटणार?

Palghar News : सरावलीतील गो ग्रीन इको टेक कंपनीवर कठोर कारवाई करा, पंकजा मुंडे यांना निवेदन
3

Palghar News : सरावलीतील गो ग्रीन इको टेक कंपनीवर कठोर कारवाई करा, पंकजा मुंडे यांना निवेदन

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध
4

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.