Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घराशेजारी झुडपात लपवले पिस्तूल; पुणे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले

पुणे शहरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 16, 2026 | 12:30 AM
घराशेजारी झुडपात लपवले पिस्तूल; पुणे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले

घराशेजारी झुडपात लपवले पिस्तूल; पुणे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले

Follow Us
Follow Us:
  • वडगाव शेरीत पिस्तूल बाळगणाऱ्या प्रथमेश जाधवला अटक
  • आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त
  • दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची आरोपीची कबुली
पुणे : पुणे शहरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले आहे. प्रथमेश उर्फ दाद्या धनंजय जाधव (वय २६, रा. सोपाननगर, गल्ली क्रमांक ३, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनमधील अधिकारी आणि कर्मचारी परिमंडळ सातच्या हद्दीत नियमित गस्त घालत होते. यावेळी वडगाव शेरी परिसरातील प्रथमेश जाधव याच्याकडे पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती पोलीस शिपाई गणेश खरात आणि अनिल कुसाळकर यांना मिळाली. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पथकाने तातडीने हालचाली सुरू केल्या.

पोलिसांनी जाधव याला पकडण्यासाठी परिसरात सापळा रचला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने घराशेजारील एका झुडपात पिशवी लपवून ठेवल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या ठिकाणी तपासणी केली असता पिशवीमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस आढळून आले. पोलिसांनी दोन्ही वस्तू जप्त केल्या.

हे सुद्धा वाचा  : घरातून बाहेर पडले अन् परतलेच नाहीत! कळंब तालुक्यात दोन तरुणांच्या अपहरणाने खळबळ

दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची कबुली

प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपीने परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. आरोपीने हे पिस्तूल कोणाकडून मिळवले, त्याचा वापर यापूर्वी कोणत्या गुन्ह्यात केला आहे का आणि त्याच्यासोबत अन्य कोणी सहभागी आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील पोलीस कर्मचारी गणेश खरात, अनिल कुसाळकर, घावटे आणि वाघमारे यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे वडगाव शेरी परिसरात बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे सुद्धा वाचा : अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव काय आहे?

    Ans: प्रथमेश उर्फ दाद्या धनंजय जाधव (वय २६, रा. सोपाननगर, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

  • Que: पोलिसांनी आरोपीकडून काय जप्त केले?

    Ans: पोलिसांनी आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले आहे.

  • Que: आरोपीला कोणत्या पथकाने आणि कुठे अटक केली?

    Ans: पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनने वडगाव शेरी परिसरात सापळा रचून आरोपीला अटक केली.

Web Title: Pune police have arrested an accused who was in possession of a pistol nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Gondiya News: २८ आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती धोकादायक; ३९४ पदे रिक्त, ग्रामीण आरोग्यसेवेचे वास्तव उघड
1

Gondiya News: २८ आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती धोकादायक; ३९४ पदे रिक्त, ग्रामीण आरोग्यसेवेचे वास्तव उघड

10 स्वीकृत नगरसेवकांचा तिढा शुक्रवारी सुटणार? भाजपच्या सात जागांसाठी दीडशेहून अधिक इच्छुक
2

10 स्वीकृत नगरसेवकांचा तिढा शुक्रवारी सुटणार? भाजपच्या सात जागांसाठी दीडशेहून अधिक इच्छुक

रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘या’ तारखेला एकदिवसीय संप
3

रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘या’ तारखेला एकदिवसीय संप

शिक्रापूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 13 दुकाने फोडली; गुन्हे शाखेकडून एकाला अटक
4

शिक्रापूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 13 दुकाने फोडली; गुन्हे शाखेकडून एकाला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.