मुंबई: चित्रपट निर्मिती क्षेत्रात काम करण्यासाठी एकत्रित सुरू केलेल्या आनंदीता एन्टरटेनमेंट एलएलपी कंपनीमधील भागिदारांनीच दीड कोटी रक्कमेची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेता अभिनेता विवेक ओबेरॉयने अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतली आहे. याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निर्माता संजय सहा यांच्यासह नंदिता सहा, राधिका नंदा व इतर आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
ओबेरॉय मेगा इंटरटेमेंटचे सनदी लेखापाल देवेन जवाहरलाल बाफना (५७) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २४ फेब्रुवारी २०१७ रोजी ओबेरॉय ऑर्गनिक एलएलपीची स्थापना करण्यात आली होती. विवेक आणि त्यांची पत्नी प्रियंका या कंपनीचे भागीदार आहेत.