कन्नड : आगामी लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरची आपल्याकडेच आहे. त्याची काळजी करू नका. पक्ष व मुख्यमंत्री शिंदे साहेब जो उमेदवार देतील त्याला रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने निवडून द्यायचे, तालुका सतत शिवसेनेसोबत आहे. याहीवेळी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मतदान करून आपला उमेदवार निवडून द्यायचा आहे, असे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी येथे शिवसंपर्क अभियान निमित्ताने झालेल्या मेळाव्यात सांगितले.
यावेळी अन्य पक्षाच्या महिला, कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश जागा चिंता तुम्ही आहे. हा मला जे खाते मिळाले आहे अगोदर काय होते मी झाल्यानंतर त्यास नावारूपाला आणले, तुमच्या तालुक्यातच मग्रारोहयोमधून सिंचन विहिरी, गाय गोठे, वृक्षलागवड, शेततळे, फळबाग व पाणंद रस्ते मंजूर करून दिले व गरिबांची कामे मी केले, कारण मी शब्द देतो तो पूर्ण करतो. लवकरच तालुक्याचा दौरा करून सर्कलवाईज भेटी देणार आहे. पहिले पालकमंत्री आम्हा आमदारांना भेटत नव्हते तर मी मात्र हात दाखवा गाडी थांबवा असा कुणालाही भेटतो केला, असे सांगण्यास ते विसरले नाहीत.
यावेळी शहरप्रमुख योगेश देशमुख, सतीश शेळके, नारायण बोडखे, राजेंद्र गाढेकर, योगेश घुले, दिलीप पवार, सरपंच दीपक आखाडे, सरपंच कल्याण गुळवे, सोमनाथ जाधव, काकासाहेब काळे, प्रशांत भडाईत, अरुण राठोड, अक्षय सिरसाट, कल्याण हरदे, दीपक कुमावत आदींसह शिवदूत, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.