Agriculture Minister Manikrao Kokate gave his first reaction after being sentenced to imprisonment
नाशिक : अजित पवार गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. माणिकराव कोकाटे यांना वर्षांची कारावासाची शिक्षा आणि ५० हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. यावर आता माणिकराव कोकाटे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांसमोर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. नाशिक जिल्हा कनिष्ठ न्यायालयात त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर सुनावणी सुरू असून, थोड्याच वेळात जामिनाबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता माणिकराव कोकाटे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, न्यायालयाचा रितसर निकाल लागलेला आहे, ट्रायल झाल्यानंतर निकाल लागतो. मला न्याय मागण्याचा अधिकार त्यामुळे मी आता वरच्या कोर्टात अपील करणार आहे. हा खटला 1995 चा आहे, पण न्याय प्रणालीनुसार त्याचा निकाल आज लागला. त्यामुळे त्याला जरी उशिर झाला असला तरी आज निकाल लागला आहे. आता मी वरच्या कोर्टात अपील करणार आहेत. ही न्यायालयीन बाब असल्यामुळे मी या संदर्भात जास्त भाष्य करणार नाही. आता माझ्या राजीनाम्याची देखील मागणी होऊ शकते, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
राज्याच्या मुख्यमंत्री कोट्यातून कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून म्हणजे कमी दरात घरं उपलब्ध केली जाते. त्यासाठी इच्छुक व्यक्तीला आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी 1995 मध्ये या योजनेंतर्गत सदनिका मिळवली होती. आवश्यक कागदपत्रे सादर करून शहरातील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्हू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या. इतकेच नव्हे तर, या इमारतीतील अन्य दोन सदनिका इतरांनी मिळवल्या, त्याचा वापर कोकाटे बंधूंकडून केला जात होता. या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमीन(कमाल मर्यादा विनियमन) विभागाचे तत्कालीन विश्वनाथ पाटील यांनी ॲड. माणिक कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह एकूण चार जणांविरुद्ध बनावट दस्तावेजाच्या आधारे सदनिका मिळवत शासनाची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली होती. त्यावरून चार जणांविरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महाराष्ट्संबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधु सुनील कोकाटे यांच्यावर सरकारची फसवणूक करुन सदानिका घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यासह आणखी दोघांवर आरोप करण्यात आला होता. मात्र पुराव्यांच्या अभावी त्यांचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. मात्र कोकाटे बंधूना शिक्षा सुनावण्यात आली आहे.