Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृषी योजनांच्या लाभासाठी आता ‘ही’ नोंदणी करणे बंधनकारक; अन्यथा मिळणार नाही लाभ

पीएम किसानच्या लाभार्थीपैकी 87 हजार शेतकऱ्यांनी अद्यापही ॲग्रिस्टॅक नोंदणी केलेली नाही. उर्वरित शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी न केल्यास त्यांना पीएम किसान योजनेचा व कृषी विभागाच्या इतर योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 30, 2025 | 01:22 PM
'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा; अन्यथा गांजा लागवडीला परवानगी द्या'; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा; अन्यथा गांजा लागवडीला परवानगी द्या'; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : कृषी योजनांच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) काढल्याशिवाय कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळणार नसल्याने सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

हेदेखील वाचा : “…याला काय बदला म्हणतात का? खासदार संजय राऊतांनी उडवली केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयाची खिल्ली

राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे यासाठी केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. ॲग्रीस्टॅक योजनेमुळे शेतकऱ्यांना पीएम किसान योजना, पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नुकसान भरपाई, पीक कर्ज आदी विविध योजनांचा थेट लाभ मिळणार असून, डिजिटल पद्धतीने जमीन नोंदीमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. या योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू-संदर्भीकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे.

पीएम किसानच्या लाभार्थीपैकी 87 हजार शेतकऱ्यांनी अद्यापही ॲग्रिस्टॅक नोंदणी केलेली नाही. उर्वरित शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी न केल्यास त्यांना पीएम किसान योजनेचा व कृषी विभागाच्या इतर योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येईल. अडचण येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी तात्काळ पोर्टलवर नोंदणी करावी. ॲग्रिस्टॅक योजनेच्या नोंदणीसाठी सातबारा, आधारकार्ड हे कागदपत्रे आणि आधार कार्ड लिंक असलेला दूरध्वनी क्रमांक आवश्यक आहे.

ॲग्रिस्टॅक योजनेसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी साधावा संवाद

ॲग्रिस्टॅक योजनेच्या नोंदणीसाठी संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या नागरी सुविधा केंद्राशी तसेच संबंधित गावातील ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक, ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. तसेच शेतकरी स्वतः https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या लिंकवर जाऊन ॲग्रिस्टॅक नोंदणी करू शकतात. कुटुंबातील प्रत्येक सातबारा धारक सदस्यांनी यामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे, असेही काचोळे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

हेदेखील वाचा : Devendra Fadnavis: भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार पुन्हा महाराष्ट्रात, सरकारने लिलावात वैभवशाली वारसा घेतला विकत

Web Title: Agristack registration mandatory for benefit of agricultural schemes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 01:22 PM

Topics:  

  • Agricultural Commodities
  • Farmers Issues
  • Maharashtra Government Scheme

संबंधित बातम्या

‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’; ‘सिध्देश्वर’च्या सर्वसाधारण सभेत धर्मराज काडादी यांची ग्वाही
1

‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’; ‘सिध्देश्वर’च्या सर्वसाधारण सभेत धर्मराज काडादी यांची ग्वाही

महिलांनो, लाडकी बहीण योजनेतून पैसे घेताय? तर ‘ही’ बातमी महत्त्वाची, सरकार 15 कोटी रुपये घेणार परत
2

महिलांनो, लाडकी बहीण योजनेतून पैसे घेताय? तर ‘ही’ बातमी महत्त्वाची, सरकार 15 कोटी रुपये घेणार परत

लाडक्या बहिणींनो, e-KYC बंधनकारक असली तरी काळजी करू नका; ‘या’ स्टेप्स् फॉलो करा अन् KYC करून घ्या
3

लाडक्या बहिणींनो, e-KYC बंधनकारक असली तरी काळजी करू नका; ‘या’ स्टेप्स् फॉलो करा अन् KYC करून घ्या

Namo Drone Didi Yojana : आता ड्रोन उडवणार महिला, मोदी सरकार देणार पूर्ण प्रशिक्षण व आर्थिक मदत; ‘अशा’ प्रकारे मिळेल योजनेचा लाभ
4

Namo Drone Didi Yojana : आता ड्रोन उडवणार महिला, मोदी सरकार देणार पूर्ण प्रशिक्षण व आर्थिक मदत; ‘अशा’ प्रकारे मिळेल योजनेचा लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.