Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहिल्यानगर शहरात दोन वेळा होणार स्वच्छता! स्वतः आमदार संग्राम जगताप स्वच्छतेसाठी उतरेल रस्त्यावर

स्वच्छतेचे महत्व ओळखून अहिल्यानगर शहरात आता एक वेळ नव्हे तर दिवसातून दोन वेळा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 01, 2025 | 07:21 PM
अहिल्यानगर शहरात दोन वेळा होणार स्वच्छता!

अहिल्यानगर शहरात दोन वेळा होणार स्वच्छता!

Follow Us
Close
Follow Us:

अहिल्यानगर शहरात आता एक वेळ नव्हे तर दिवसातून दोन वेळा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला गती देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी स्वतः रस्त्यावर उतरून स्वच्छतेचा शुभारंभ केला. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना दिल्या आहेत.

सध्या महापालिकेकडून ८० घंटागाड्यांमार्फत कचरा संकलनाचे काम सुरू आहे. नागरिकांनी आपला घरासोबत परिसरही स्वच्छ ठेवावा आणि कचरा फक्त घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन जगताप यांनी केले. त्यांनी म्हंटले की, “आपली मातृभूमी आणि कर्मभूमी असलेले हे शहर प्रत्येकाने स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली पाहिजे. इंदौरप्रमाणे स्वच्छ शहर निर्माण करण्याचे लक्ष्य आपल्याला मिळून साध्य करायचे आहे.”

Ahilyanagar News: शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला कवडीमोल भाव! हलक्या कापसाने बळीराजाचे टेन्शन वाढवले

दोन वेळा स्वच्छतेचा जुना निर्णय पुन्हा राबविणार

शहरात दोन वेळा स्वच्छता करण्याचा निर्णय यापूर्वीही घेण्यात आला होता. मात्र त्यावेळी महापालिका कर्मचारी युनियनच्या विरोधामुळे हा निर्णय अमलात आला नव्हता. त्या वेळीचे युनियन अध्यक्ष आक्रमक भूमिकेत होते, त्यामुळे प्रशासनाने माघार घेतली होती. आता मात्र युनियन पदाधिकारी बदलले असल्याने या निर्णयाला फारसा विरोध होण्याची शक्यता कमी आहे.

स्वच्छतेचे दोन टप्पे निश्चित

आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की, शहरातील स्वच्छता दोन टप्प्यांत केली जाईल.

  • पहिला टप्पा: सकाळी ६ ते १०
  • दुसरा टप्पा: दुपारी २ ते ६

महापालिकेचे कर्मचारी शहरातील सर्व प्रभागांमध्ये या वेळापत्रकानुसार स्वच्छतेचे काम करतील.

मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ, याद्या दुरुस्त करूनच निवडणुका घ्या; बाळासाहेब थोरातांची मागणी

पतसंस्थेच्या निवडणुकीमुळे निर्माण झालेले राजकीय समीकरण

महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा प्रभाव नेहमीच निर्णायक राहिला आहे. दोन वेळा स्वच्छतेच्या निर्णयाला कर्मचारी विरोध करतात, कारण त्यावर त्यांचा अतिरिक्त कामाचा बोजा वाढतो. यामुळे पतसंस्थेच्या निवडणुकीवर या निर्णयाचा परिणाम होईल का, याबाबत सध्या चर्चेला उधाण आले आहे.

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर १,००० रुपयांचा दंड

आयुक्त डांगे यांनी सांगितले की, काही नागरिक अजूनही प्लास्टिक पिशवीत कचरा गोळा करून रस्त्यावर टाकतात, ज्यामुळे नाले-गटारे बंद होतात. अशा नागरिकांवर १,००० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. स्वच्छता निरीक्षकांनी आपल्या प्रभागात नियमित तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. “नागरिकांनी कचरा वेळेवर घंटागाडीतच द्यावा आणि शहर स्वच्छतेसाठी सहकार्य करावे,” असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.

Web Title: Ahilyanagar city will be cleaned twice in a day mla sangram jagtap initiative for city cleaniness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 07:21 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News
  • Swachhta Mission

संबंधित बातम्या

Raigad News : कोट्यावधीच्या विकास कामांचे लोकार्पण; आदिती तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन
1

Raigad News : कोट्यावधीच्या विकास कामांचे लोकार्पण; आदिती तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

Latur News : सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी, छावा संघटना आक्रमक
2

Latur News : सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी, छावा संघटना आक्रमक

Nagpur : राज ठाकरे पासून सगळ्यांना राहुल गांधींचा मुद्दा पटला आहे – विजय वडेट्टीवार
3

Nagpur : राज ठाकरे पासून सगळ्यांना राहुल गांधींचा मुद्दा पटला आहे – विजय वडेट्टीवार

Ahilyanagar News: शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला कवडीमोल भाव! हलक्या कापसाने बळीराजाचे टेन्शन वाढवले
4

Ahilyanagar News: शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला कवडीमोल भाव! हलक्या कापसाने बळीराजाचे टेन्शन वाढवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.