Renault झाली मालामाल! December 2025 च्या विक्रीत जबरदस्त वाढ, जाणून घ्या Sales Report
डिसेंबर 2025 हा महिना Renault India साठी विशेष ठरला. या महिन्यात कंपनीने 3,845 युनिट्सची विक्री केली असून, डिसेंबर 2024 च्या तुलनेत ही वाढ तब्बल 33.4 टक्के आहे. Q3 पासून सुरू झालेला सकारात्मक ट्रेंड Q4 मध्ये अधिक मजबूत झाला, विशेषतः नवीन आणि अपडेटेड मॉडेल्स ग्राहकांपर्यंत पोहोचल्यानंतर.
अरे बाईक आहे की लक्झरी कार? किंमत इतकी जास्त की दारात दोन Fortuner उभ्या राहतील!
Renault Group India चे CEO स्टेफान डेब्लेझ (Stephane Deblaise) यांनी सांगितले की, “CY2025 च्या दुसऱ्या सहामाहीतील कामगिरी ही भारतातील Renault साठी आम्ही ठरवलेल्या दिशेची साक्ष आहे. पोर्टफोलिओ ट्रान्झिशननंतर Q3 पासून सातत्याने सुधारणा दिसून आली आणि Q4 तसेच डिसेंबरमधील सर्वोत्तम मासिक विक्रीने आमच्या धोरणात्मक बदलांचे सकारात्मक परिणाम स्पष्ट केले आहेत. आता योग्य पायाभूत घटक तयार झाले असून, भारतातील Renault च्या नव्या प्रवासात आयकॉनिक Duster चे कमबॅक एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.”
2025 दरम्यान Renault India ने अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक पावले उचलली. यामध्ये नवीन ‘R’ स्टोअर्सची सुरुवात करून रिटेल अनुभव मजबूत करणे, भारतात Renault Design Centre ची स्थापना करून स्थानिक गरजांनुसार उत्पादन विकासावर भर देणे, ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी 3 वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी देणे, तसेच उत्पादन प्रकल्पावर 100 टक्के मालकी मिळवणे यांचा समावेश आहे. या सर्व पावलांमुळे भारत हा Renault Group च्या व्यवसायासाठी महत्त्वाचा देश असल्याचा स्पष्ट संदेश मिळतो.
याशिवाय, कंपनीने आपल्या प्रमुख मॉडेल्सना 2025 मध्ये अपडेट दिले. जुलैमध्ये नवीन Triber आणि ऑगस्टमध्ये नवीन Kiger लाँच करण्यात आली, ज्यामुळे वर्षाच्या उत्तरार्धात ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. विक्री आणि डीलर नेटवर्कच्या सुधारित अंमलबजावणीमुळे Q4 मध्ये मजबूत ‘एग्झिट मोमेंटम’ नोंदवण्यात आला.
दरम्यान, Renault ची आयकॉनिक SUV Duster पुन्हा एकदा भारतीय बाजारात परतणार असून, तिचे लाँचिंग 26 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.






