Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: जिल्ह्यातील 20 हजार शेतकऱ्यांना गारपीटीचा फटका, प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु

अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या गारपीटीमुळे 11 हजार 559 हेक्टरचे नुकसान झाले. या गारपीटीमुळे तब्बल 20 हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 23, 2026 | 08:54 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगर जिल्ह्यातील गावांना गारपीटीचा फटका
  • तब्बल 11 हजार 559 हेक्टरचे नुकसान
  • बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक संकटात
सुनील गर्जे/नेवासे: अहिल्यानगर जिल्ह्यात बुधवारी (ता. १८) आणि गुरुवारी (ता. १९) सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे ११ हजार ५५९ हेक्टरवर नुकसान झाले आहे. यातील ८१७१ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान हे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तसेच १४३ गावांतील सुमारे २० हजार ५३१ शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

अहिल्यानगरसह अकोले, पाथर्डी, राहुरी, पारनेर, शेवगाव तालुक्यांत बुधवारी (ता. १८) व गुरुवारी (ता. १९) रात्री अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. काही ठिकाणी गारपीट झाली. पावसामुळे काढणीला आलेल्या गव्हासह हरभरा, मका, कलिंगड, खरबूज, आंबा, कांद्याला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील नेवासे, राहुरी, पारनेर, कर्जत, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, अहिल्यानगर, पाथर्डी, अकोले तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, हरभऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय कांदा, मका, कलिंगड, खरबुज, हरभरा, वेगवेगळी फुले, फळपीके, आंबा, भाजीपाला, द्राक्ष यांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. फळबागांसह पिकांचे नुकसान झाल्याने अनेकांच्या डोळ्यातील अश्रू थांबलेले नाहीत.

कमी नुकसानीचे काय ?

अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्याने शेत पिकाचे मोठ्खा प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनानेच दिलेल्या आकडेवारीनुसार सुमारे तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर ३३% पेक्षा कमी नुकसान झाले आहे.

पुण्यात काय बी घडू शकतंय! ना पूर, ना पाऊस तरीही शहरात पाणीच पाणी; नेमका विषय तरी काय?

शासनाच्या निकषानुसार ३३% पेक्षा जास्त नुकसान झाले तरच मदत मिळते. नुकसान हे नुकसानच असते. कुठल्या निकषावरून ही टक्केवारी ठरवतात? त्यासाठी कसे मोजमाप केले जाते? यासंदर्भात मात्र कुठलीही माहिती शेतकऱ्यांना नाही.

शिवाय नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना या निकषामुळे मदत मिळत नाही. आधीच नैसर्गिक संकटांनी शेतकरी त्रस्त आहे. त्यात शासनाच्या निकषामुळे अनेक शेतकऱ्याना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. झालेले नुकसान पाहून मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

१४३ गावे अन २०५३१ शेतकरी

जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार १४३ गावांतील २० हजार ५३१ शेतकऱ्याचे ११ हजार ५५९ हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यात १५ हजार ७२९ शेतकऱ्यांचे ८१७१ हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त तर ४ हजार ६३२ शेतकऱ्यांचे ३०२६ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान असल्याची प्राथमिक नोंद आहे.

पंचनामे करण्याच्या तातडीने सूचना – विठ्ठलराव लंघे

बुधवार-गुरुवार झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानी बाबत मी प्रशासनास तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी प्रयत्नशील असून पाठपुरावा करणार आहे. असे वक्तव्य नेवासेचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केले आहे.

Web Title: Ahilyanagar hailstorm 20000 farmers affected crop damage panchnama process begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 08:54 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
2

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
3

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
4

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.