
फोटो सौजन्य: Gemini
जेऊर परिसरातून सीना व खारोळी या दोन मुख्य नद्या वाहत आहेत, नद्यांवर झालेल्या विविध बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटलेला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून खारोळी नदीच्या परिसरात झालेल्या जनावरांच्या गोठ्यांमुळे नदीचे तसेच परिसरातील विहिरींचे पाणी दूषित होत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. गोठ्यातील मलमूत्र व शेणखतामुळे परिसरातील पाणी दूषित होत असून पिण्यायोग्य राहिलेले नाही. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Indigo Crisis चा फटका मावळच्या गुलाब उत्पादकांना; लाखोंचे नुकसान अन्…
मागील वर्षी सदर गोठ्यांबाबत लिगाडे वस्ती येथील नागरिकांनी देखील तीव्र आक्षेप घेतला होता. खारोळी नदीचे पाणी म्हस्के वस्ती परिसरातील बंधाऱ्यात पूर्णता दूषित झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे म्हस्के वस्तीवरील तरुणांनी आक्रमक होत संबंधित गोठ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिक व लहान मुले मोठ्या प्रमाणात आजारी पडले असल्याचेही नागरिकांकडून सांगण्यात आले. संबंधित गोठ्यामुळे शेटे वस्ती, लिगाडे वस्ती, म्हस्के वस्ती, चापेवाडी परिसर, बेल्हेकर, कोथिंबीरे मळा, ठोंबरे मळा परिसरातील पाणी दूषित होत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.
Palghar News : सरावलीतील गो ग्रीन इको टेक कंपनीवर कठोर कारवाई करा, पंकजा मुंडे यांना निवेदन
परिसरातील पाणी दूषित करणाऱ्या संबंधित गोठ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी मागणी केली आहे.
संबंधित जनावरांच्या गोठ्यामुळे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
खारोळी नदीच्या तीरावर असणाऱ्या विहिरी, कुपनलिका, हातपंप यांचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे संबंधित गोठ्यांवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा म्हस्के वस्ती येथील तरुणांकडून देण्यात आला आहे.