Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: “माझ्या आईच्या पायावर जोरात काठी मारली!” मढीत वाहतूककोंडीमध्ये पोलिसांचा भाविकांना ‘प्रसाद’?

मढी येथील कानिफनाथ महाराजांच्या यात्रेसाठी आलेल्या भाविकांना पोलिसांच्या अरेरावीचा सामना करावा लागत आहे. पोलिसांच्या मनमानीबद्दल प्रवाशांनी आवाज उठविला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 10, 2026 | 10:16 PM
मढीत वाहतूककोंडीदरम्यान पोलिसांचा भाविकांना ‘प्रसाद’?

मढीत वाहतूककोंडीदरम्यान पोलिसांचा भाविकांना ‘प्रसाद’?

Follow Us
Follow Us:
  • मढीत कानिफनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त हजारो भाविक दाखल
  • यात्रेमुळे तिसगावजवळ वाहतूक कोंडी
  • पोलीस निरीक्षकांची भाविकांना अरेरावी
मढीत दरवर्षी कानिफनाथ महाराजांची यात्रा मोठ्या धुमधडाक्यात साजरा केली जाते. या यात्रेत प्रत्येक वर्षी लाखो भाविक कानिफनाथ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मढीत दाखल होत असतात. मात्र, या वर्षी भाविकांना पोलिसांचा प्रसाद मिळताना दिसत आहे.

श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ महाराजांच्या यात्रेसाठी आलेल्या भाविकांना पाथर्डी पोलिसांच्या अरेरावीचा सामना करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूक कोंडी सोडवताना पाथर्डीचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी भाविकांना दमदाटी करत वाहनांच्या काचा फोडल्याच्या गंभीर तक्रारी आहेत. तसेच एका माजी महिला नगरसेविकेला मारहाण केल्याची तक्रार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 260 शाळांवर असणार CCTV चा ‘डोळा’; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य

मढी येथील कानिफनाथांच्या यात्रेनिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. यामुळे नगर-पाथर्डी रस्त्यावर तिसगावाजवळ वाहनांच्या ४ ते ५ किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासनतास सुरू असलेल्या या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल होत होते. ही कोंडी फोडण्यासाठी पोलिस निरीक्षक विलास पुजारी स्वतः रस्त्यावर उत्तरले होते. यावेळी संभाजीनगर येथील शिवसेना नेते नीलेश बाबुराव शिंदे आणि त्यांच्या मातोश्री माजी नगरसेविका पद्मा शिंदे हे आपल्या फॉच्युनर गाडीने (क्र. एमएच २० एचएन ०००८) एका विवाह सोहळ्यासाठी चालले होते. वाहतूक कोंडीत सापडल्याने ते थांबले होते. त्यांना व त्यांच्या मातोश्रीस उद्धट वागणूक देत मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Pune LPG Shortage: पुण्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा: इराण-इस्रायल युद्धाचा पुणेकरांच्या स्वयंपाकघरावर परिणाम

आईच्या पायावर काठी मारली

प्रवासी नीलेश शिंदे यांनी सांगितले की, आम्ही त्यांना ‘काचेवर का मारता?’ असे विचारले असता, त्यांनी माझ्या आईला व मला शिवीगाळ केली. माझ्या आईच्या (पदमाताई शिंदे) पायावर जोरात काठी मारली.

सखोल तपासाबरोबरच कारवाईची मागणी

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने महिला लोकप्रतिनिधीवर हात उचलणे, वाहनांचे नुकसान करणे बेकायदेशीर असल्याचे नीलेश शिंदे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे.

विचारणा केल्याने शिविगाळ केल्याचा आरोप

नीलेश शिंदे यांनी या संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले, की पोलिस निरीक्षक पुजारी यांनी हातात लाकडी दांडा घेऊन अडकलेल्या वाहनांवर प्रहार केले. शिंदे यांच्या गाडीच्या काचेवरही त्यांनी दांडा मारला. शिंदे आणि त्यांच्या मातोश्री यांनी गाडीखाली उतरून विचारणा केली असता त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, मारहाण केल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पोलिस निरीक्षकांनी केला घटनेचा खुलासा

या सर्व आरोपांवर पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी आपली बाजू मांडली आहे. ते म्हणतात, मढी यात्रेमुळे नगर-पाथर्डी रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. ही कोडी सोडवताना प्रवाशांमध्ये किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडले आहेत. मात्र गाडीची काच फोडणे किंवा मारहाण करणे अशी कोणतीही घटना घडलेली नाही.

Web Title: Ahilyanagar news pathardi police disturbing kanifnath maharaj devotees during traffic jam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 10:16 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News
  • Pathardi

संबंधित बातम्या

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई
1

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
2

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी
3

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे
4

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.