Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापौर ज्योती गाडे संतापल्या; विभागप्रमुखांनाही सवाल

अहिल्यानगरच्या महापौर ज्योती गाडी यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे. यावेळी विभागप्रमुख नेमके करताय काय? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 10, 2026 | 08:24 PM
उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापौर ज्योती गाडे संतापल्या

उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापौर ज्योती गाडे संतापल्या

Follow Us
Follow Us:

अहिल्यानगर शहरातील महापालिका प्रशासनातील शिस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अहिल्यानगरच्या महापौर ज्योतीताई गाडे यांनी सोमवारी सकाळी मनपा प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर उभे राहून उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले. या तपासणीत सुमारे १५० कर्मचाऱ्यांपैकी ४१ कर्मचारी नियोजित वेळेनंतर कार्यालयात पोहोचल्याचे आढळून आले. यापुढे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

महापौरपदाची सूत्रे ६ फेब्रुवारी रोजी स्वीकारल्यानंतर ज्योतीताई गाडे यांनी तातडीने प्रशासनाची बैठक घेतली होती. या बैठकीत सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेवर कामावर हजर राहावे, गळ्यात ओळखपत्र असावे आणि नागरिकांची कामे प्रामाणिकपणे पार पाडावीत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र अनेक कर्मचारी या सूचनांचे पालन करत नसल्याच्या तक्रारी समोर येत होत्या.

Pune LPG Shortage: पुण्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा: इराण-इस्रायल युद्धाचा पुणेकरांच्या स्वयंपाकघरावर परिणाम

या पार्श्वभूमीवर महापौरांनी स्वतः खातरजमा करण्यासाठी तपासणी मोहीम राबवली. सोमवारी सकाळी सुमारे साडेनऊ वाजता त्या स्वीय सहायक श्रीधर देशपांडे यांच्यासह महापालिकेच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्या. उन्हात उभे राहून त्यांनी कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद घेतली. या तपासणीत ४१ कर्मचारी उशिरा आल्याचे स्पष्ट झाले.

महापौर गाडे म्हणाल्या की, कर्मचाऱ्यांच्या उशिरामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना वारंवार महापालिकेत हेलपाटे मारावे लागतात आणि त्यांचा रोष पदाधिकाऱ्यांवर व्यक्त होतो. त्यामुळे यापुढे कामचुकारपणा अजिबात सहन केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतील त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू; मात्र कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल आणि कोणाचीही गई केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Latur Municipal Corporation: लातूर मनपात स्वीकृत नगरसेवकांचा सस्पेन्स संपला; अधिकृत निवड आज होणार

विभागप्रमुख नेमके करतात काय?

कामावर येण्याची वेळ न पाळणे ही मनपा कर्मचाऱ्यांची जुनी समस्या असल्याचे बोलले जाते. महापौर काही वेळ गेटवर उभ्या राहिल्या असत्या तर उशिरा येणाऱ्यांची संख्या आणखी वाढली असती, अशीही चर्चा आहे.

मुख्यालयात बायोमेट्रिक हजेरी प्रणाली असतानाही तिचा प्रभावी वापर होतो का? प्रत्येक कर्मचाऱ्याची वेळ नोंदली जात असताना उशिरा येणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? तसेच विभागप्रमुख आणि आस्थापना विभाग नेमके काय करत आहेत? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. महापौर ज्योतीताई गाडे यांनी याबाबत विभागप्रमुख आणि आस्थापना विभागाला जाब विचारल्यास प्रशासनातील शिस्त सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Ahilyanagar mayor jyoti gade gets angry at employees coming late

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 08:24 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?
1

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार
2

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा
3

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा

Rishabh Sawhney Birthday: ‘फायटर’मधील डेंजर्स खलनायकापासून ते ‘नागाबंधम’मधील मेगा व्हिलनपर्यंत, ऋषभ साहनीचा पडद्यावर दमदार अंदाज
4

Rishabh Sawhney Birthday: ‘फायटर’मधील डेंजर्स खलनायकापासून ते ‘नागाबंधम’मधील मेगा व्हिलनपर्यंत, ऋषभ साहनीचा पडद्यावर दमदार अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.