Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : शिक्षण घ्यावं तरी कसं ? 42 शिक्षक पदं रिक्त; दोन-तीन तुकड्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल

मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 10, 2026 | 06:54 PM
Sangali News : शिक्षण घ्यावं तरी कसं ? 42 शिक्षक पदं रिक्त; दोन-तीन तुकड्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल
Follow Us
Follow Us:
  • शिक्षण घ्यावं तरी कसं ?
  • 42 शिक्षक पदं रिक्त;
  • दोन-तीन तुकड्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल
सांगली : मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. शहरातील ५१ महापालिका शाळांमध्ये तब्बल ५ हजार ३०७ विद्यार्थी शिक्षण घेत असताना अनेक ठिकाणी गळक्या इमारती, अपुरी वर्गखोल्या आणि शिक्षकांच्या मोठ्या तुटवड्यामुळे विद्यार्थ्यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे. काही शाळांमध्ये एकाच वर्गखोलीत दोन ते तीन वर्ग भरवले जात असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रारही पुढे आली आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटनेते युवराज गायकवाड यांनी शनिवारी मनपा शाळा क्रमांक ३, ७, १७ व २९ ला अचानक भेट देत परिस्थितीची पाहणी केली. पाहणीदरम्यान शाळांच्या इमारतींची दुरवस्था, अपुऱ्या सुविधा आणि शिक्षकांच्या कमतरतेमुळे शिक्षणाची गुणवत्ता धोक्यात आल्याचे दिसून आले. महापालिकेच्या शाळांमध्ये सध्या शिक्षकांची तब्बल ४२ पदे रिक्त आहेत. परिणामी काही शाळांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांमागे केवळ ४ ते ७ शिक्षक कार्यरत असल्याचे वास्तव समोर आले. शाळा क्रमांक ७ मध्ये ४३० विद्यार्थ्यांसाठी अवघे ७ शिक्षक आहेत, तर खणभाग येथील उर्दू शाळेत २५० विद्यार्थ्यांसाठी फक्त ४ शिक्षकांवर शिक्षणाची जबाबदारी आहे.

Kolhapur News : हॉटेल व्यावसायिकांचा पर्यावरणाशी ‘खेळ’ सुरू ;शहरातील हॉटेल्समुळे होतंय जलप्रदुषण!

सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने मद्यपी आणि नशेखोरांचा वावर वाढत असल्याचे स्पष्ट
सुरक्षेच्या दृष्टीनेही परिस्थिती चिंताजनक आहे. मनपाच्या ४० शाळांमध्ये अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत. काही ठिकाणी रात्रीच्या वेळी महापी आणि नशेखोरांचा वावर होत असल्याची माहितीही समोर आली. तसेच अनेक शाळांची स्वच्छतागृहे वापरण्यायोग्य नसून काही ठिकाणी संरक्षक भिंती पडल्याने इमारती असुरक्षित झाल्या आहेत. खणभागातील उर्दू शाळेवर गेल्या सात-आठ वर्षात प्रशासनाने कोणताही निधी खर्च केला नसल्याचेही निदर्शनास आले.

6 सत्ताधारी आणि प्रशासनाने केवळ गुणवतेच्या गप्पा न मारता विद्यार्थ्यांना किमान भौतिक सुविधा द्याव्यात. गोरगरीबांच्या मुलाना अशा परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागणे ही लाजिरवाणी बाब आहे. या प्रश्नावर आम्ही तीव्र आवाज उठवणार आहोत, असं विरोधीपक्ष नेते, मंगेश चव्हाण यांनी सांगितलं आहे.

Maharashtra Governor oath-taking : महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल! जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी सोहळा पार

 

Web Title: Sangali news muncipal corporation school 42 teacher posts vacant students are suffering due to two three vacancies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Sangali News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.