Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले 1710 कोटीचे अंदाजपत्रक

अहिल्यानगर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मनपा आयुक्त यशवंत डांगे 2026-27 साठी 1710 कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापतींकडे सुपूर्द केले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 18, 2026 | 08:40 PM
Ahilyanagar News: महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले 1710 कोटीचे अंदाजपत्रक

Ahilyanagar News: महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले 1710 कोटीचे अंदाजपत्रक

Follow Us
Follow Us:

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या उत्पन्नात होत असलेली सातत्याने घट आणि त्याच वेळी वाढत चाललेला खर्च यामधील ताळमेळ साधणे किती कठीण झाले आहे, याची प्रचिती आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातून आली. महापालिका आयुक्त Yashwant Dange यांनी सन 2026-27 साठीचे 1710 कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती Subhash Londhe यांच्याकडे सुपूर्द केले.

या अर्थसंकल्पात शहर विकासासाठी राज्य व केंद्र सरकारच्या निधीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहण्यात आल्याचे दिसून येते. महापालिकेच्या स्वतःच्या निधीतून कोणती कामे हाती घेतली जाणार, याबाबत स्पष्टता नसल्याचेही जाणवते. तसेच उत्पन्नवाढीसाठी नवीन उपाययोजना किंवा प्रयोग यांचा अभावही या अंदाजपत्रकातून दिसतो.

Sangli Politics: सांगलीत ‘ऑपरेशन लोटस’ फसले; अफवांना पूर्णविराम, रोहित पाटील गट ठामपणे महाविकास आघाडीसोबत

तथापि, नागरिकांना चांगले रस्ते, मूलभूत आरोग्य सुविधा, पथदिवे, शुद्ध व मुबलक पाणी आणि स्वच्छतेच्या सेवा देण्याची बांधिलकी महापालिकेने व्यक्त केली आहे. विविध विकासकामांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून मुलभूत सुविधा विकास योजना, दलितेतर वस्ती सुधारणा योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, अल्पसंख्यांक विकास निधी, 15 वा वित्त आयोग, सर्वांसाठी घरे योजना, दलित वस्ती सुधारणा, आपत्ती व्यवस्थापन, पर्यटनासाठी पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा, आमदार व खासदार निधी, रस्ते सुरक्षा योजना, शहर सौंदर्यीकरण, जिल्हा ग्रंथालय इमारत बांधकाम, ई-बस सेवा केंद्र तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना आदी प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

यासोबतच नवीन प्रकल्पांसाठी शासनाकडून अधिक निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर, मुख्य लेखाधिकारी तथा उपायुक्त मेहेर लहारे, उपायुक्त शहाजहान तडवी, लेखापरीक्षक गणेश लयचेट्टी आणि लेखा विभागाचे अनिल लोंढे आदी अधिकारी उपस्थित होते.

Heatwave News: ‘या’ जिल्ह्यामध्ये ‘हीट वेव्ह’चा इशारा, उष्माघात टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट

शहरातील सर्व मालमत्तांचे फेरसर्वेक्षण होणार

मध्यंतरी महापालिकेने शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केले. त्यातील वाढीव बांधकाम करणारे, भाडेकरू ठेवलेले अशा मालमत्ताधारकांना नव्याने घरपट्टी आकारून बिले दिली. यावरून बराच गोंधळ उडालेला आहे. नव्याने सत्तेवर आलेले सत्ताधारी या आकारणीच्या विरोधात आहेत. असे असताना आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

असे महसुली उत्पन्न

महसुली उत्पन्न ४८१ कोटी ०४ लाख
भांडवली जमा ११६१ कोटी ४२ लाख
महसुली उत्पन्नात संकलित करापोटी १०३ कोटी ८० लाख
संकलित करावर आधारित करापोटी ८९ कोटी ७० लाख
जीएसटी अनुदान १५१ कोटी ९२ लाख
इतर महसुली अनुदान १७ कोटी २७ लाख
इतर उत्पन्नापोटी ४२ कोटी ३९ लाख
अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा असे ११६१ कोटी ४२ लाख

पैसा असा होणार खर्च

वेतन, भत्ते, मानवन १६१ कोटी ९० लाख,
पेन्शन, सेवा उपदान ७१ कोटी ५० लाख
पाणी पुरवठा व पथदिवे वीजबिल ५३ कोटी
शिक्षण विभाग हिस्सा ६ कोटी ५० लाख
महिला व बाल कल्याण योजना दोन कोटी ५५ लाख
सदस्य प्रभाग स्वेच्छानिधी ९ कोटी ६२
कचरा संकलन व वाहतूक २० कोटी
अशुध्द पाणी आकार ५ कोटी
अग्निशमन वाहने खरेदी ३ कोटी
मालमत्ता सर्वेक्षण १० कोटी

Web Title: Ahilyanagar municipal coroporation budget 2026 27 is announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
3

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
4

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.