Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: प्रस्ताव नसल्याने 58 लाख रुपये धूळखात? नेवाशाच्या उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांची तक्रार

दलित वस्ती कामाचे प्रस्ताव पाठविले नसल्याबाबतची लेखी तक्रार उपनगराध्यक्ष शालिनी संजय सुखधान यांनी नेवासे नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 19, 2026 | 10:24 PM
नेवाशाच्या उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांची तक्रार

नेवाशाच्या उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांची तक्रार

Follow Us
Close
Follow Us:

नेवासे येथील नगरपंचायतीने सन २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामांचे प्रस्ताव पाठविले नसल्याबाबत उपनगराध्यक्ष शालिनी संजय सुखधान यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. प्रस्ताव न पाठवल्यामुळे सुमारे ५८ लाख ६५ हजार रुपयांचा निधी प्रलंबित राहिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नेवासे नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक २ आणि १६ हे अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहेत. या प्रभागांसाठी दरवर्षी जिल्हा नियोजन समितीमार्फत ‘आण्णा भाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना’ अंतर्गत निधी उपलब्ध होतो. मात्र, चालू वर्षात नगरपंचायतीकडून कोणतेही प्रस्ताव पाठविण्यात आले नसल्याचे सुखधान यांनी नमूद केले आहे.

Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरिया खताचा काळाबाजार! शेतकऱ्यांच्या खिशाला दुहेरी कात्री

अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर नगरपंचायती, नगरपरिषदा, नगरपालिका आणि महानगरपालिकांनी संबंधित कामांचे प्रस्ताव वेळेत सादर करून निधी मंजूर करून घेतला, तसेच निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामेही सुरू केली आहेत. त्याउलट नेवासे नगरपंचायतीकडून प्रस्ताव न पाठवल्यामुळे निधी अखर्चित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर वेळेत मान्यता घेतली नाही, तर हा निधी शासनाकडे परत जाऊ शकतो आणि प्रभाग २ व १६ मधील नागरिक लाभापासून वंचित राहू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.

सध्याच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मधील मुंबादेवी मंदिराजवळ दोन लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारणे आणि जुन्या पाणीपुरवठा विहिरीवरून पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव तत्काळ पाठवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

विशेष सभा बोलावण्याची मागणी

२३ जानेवारी रोजी नगराध्यक्षांना सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर दलित वस्ती निधी संदर्भातील प्रस्ताव घेण्याबाबत लेखी पत्र देण्यात आले होते. तरीदेखील हा विषय अजेंड्यावर न घेता प्रस्ताव नियोजन समितीकडे पाठवला गेला नाही, असा आरोप सुखधान यांनी केला आहे.

Washim News: जि.प.त अवतरणार जिजाऊंसह बाल शिवबा! पालकमंत्र्यांसह राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले अनावरण

त्यामुळे हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी विशेष सभा बोलवावी, अन्यथा निधी अखर्चित राहून लाभार्थी योजनेपासून वंचित राहतील, असा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे.

कारण स्पष्ट करण्याची मागणी

सन २०२५-२६ या वर्षासाठी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी मिळवण्यात अपयश आल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही सुखधान यांनी नमूद केले आहे. दलितेतर व वैशिष्ट्यपूर्ण योजनांसाठी प्रस्ताव पाठवले गेले असताना दलित वस्ती सुधार योजनेचे प्रस्ताव का पाठवले गेले नाहीत, याचे कारण प्रशासनाने स्पष्ट करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Web Title: Ahilyanagar news complaint by deputy mayor of newasha shalini sukhdhan in nevasa nagar panchayat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 10:24 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरिया खताचा काळाबाजार! शेतकऱ्यांच्या खिशाला दुहेरी कात्री
1

Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरिया खताचा काळाबाजार! शेतकऱ्यांच्या खिशाला दुहेरी कात्री

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न
2

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा
3

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

हळदीत होणार जल्लोष! ‘सुपर डुपर’ मधील ‘नाचा दणाना’ गाण्यावर थिरकणार महाराष्ट्र; ललित-विदुलाची केमिस्ट्री कमाल
4

हळदीत होणार जल्लोष! ‘सुपर डुपर’ मधील ‘नाचा दणाना’ गाण्यावर थिरकणार महाराष्ट्र; ललित-विदुलाची केमिस्ट्री कमाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.