Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: नगर-मनमाड रस्त्यावर 8 दिवसात 8 बळी! रस्ता दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करू, प्राजक्त तनपुरेंचा इशारा

नगर मनमाड रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. यामुळे मागील 8 दिवसात 8 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावर माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 30, 2025 | 04:50 PM
नगर-मनमाड रस्त्यावर 8 दिवसात 8 बळी!

नगर-मनमाड रस्त्यावर 8 दिवसात 8 बळी!

Follow Us
Close
Follow Us:
  • नगर मनमाड रस्त्याची दुरावस्था 
  • 8 दिवसात 8 बळी
  • माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचा आंदोलनाचा ईशारा

नगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील राहुरी शहराजवळील रस्त्यांची दयनीय अवस्था लक्षात घेता, दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले नाही, तर आठ दिवसांत मोठ्या रास्तारोको आंदोलनाचा इशारा माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.

राहुरी बसस्थानक चौकातील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून मोठे खड्डे लपले जात आहेत. त्यामुळे दररोज अपघात घडत असून प्रवासी व शहरवासींना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. ठेकेदार कंपनीने कामाच्या निमित्ताने रस्ता खरडून काढल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या कपारी तयार झाल्या आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघातांची संख्या वाढली आहे.

शहरातील विद्यार्थ्यांनाही गैरसोय

दरम्यान, शाळा आणि महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनाही प्रवासात अडचणी येत आहेत. त्यामुळे किमान राहुरी शहरातून जाणारा रस्ता तरी तातडीने दुरुस्त व्हावा, अशी मागणी नागरिक व स्थानिक नेते करत आहेत.

Yavatmal City News :- पांढरकवडा आणि उमरखेडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई- विनापरवाना रेती वाहून नेणारे पकडले पाच आरोपींना अटक

आठ दिवसांत आठ बळी

गेल्या आठ दिवसांत आठ नागरिकांचा या रस्त्यावर बळी गेला असून, यामुळे परिसरात तीव्र संताप उसळला आहे. अशा परिस्थितीतही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीने हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तनपुरे यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आठ दिवसांची मुदत दिली असून, “त्यानंतर आंदोलन अटळ राहील,” असा इशारा दिला आहे.

पावसामुळे राहुरीतील रस्त्यांची दुरवस्था

गेल्या दोन दिवसांपासून राहुरीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची पूर्णपणे चाळण झाली आहे. ठेकेदार कंपनीने खड्डे बुजवण्याऐवजी रस्ता खरडून टाकल्याने खडी बाहेर आली असून, नवीन कपारी निर्माण झाल्या आहेत. परिणामी, अपघातांची संख्या वाढीस लागली आहे. दुचाकीस्वारांना कसरत करत रस्ता पार करावा लागत आहे, अशी विचित्र परिस्थिती वर्दळीच्या ठिकाणी निर्माण झाली आहे.

Online Engagement: परंपरा आणि प्रगतीचा संगम! लंडनकर झाला वैजापूरचा जावई; व्हिडिओ कॉलद्वारे पार पडला अनोखा साखरपुडा

कामाची कासवगती नागरिकांना जीवघेणी

नगर–मनमाड रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून कासवगतीने सुरू असून, दरम्यान झालेल्या अपघातांमध्ये शेकडो नागरिक मृत्युमुखी, तर हजारो अपंग झाले आहेत. तरीही रस्त्याला लागलेले ‘ग्रहण’ दूर झालेले नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.

या वेळी सागर तनपुरे, प्रदीप भुजाडी, ज्ञानेश्वर जगधने, धनंजय महसे, राजेंद्र बोरकर, मयूर शेळके, नामदेव हरिचंद्रे, पवन कारंडे, सागर काळे, रवी आहेर, अजहर खान, रफिक शेख, रवींद्र तनपुरे आणि प्रल्हाद ठंडे आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Ahilyanagar news nagar manmad road bad situation prajakta tanpure warns government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: कोपरगाव पॅटर्नची सगळीकडे चर्चा! तहसीलदारांनी थेट बांधावर जाऊनच…
1

Ahilyanagar News: कोपरगाव पॅटर्नची सगळीकडे चर्चा! तहसीलदारांनी थेट बांधावर जाऊनच…

‘अंत्योदय’ चे तीन तेरा, शपथ की स्टंट? नायगावातील भ्रष्टाचारावर आमदार राजेश पवारांची ‘गांधीगिरी’ की ‘राजकीय नाट्यगिरी
2

‘अंत्योदय’ चे तीन तेरा, शपथ की स्टंट? नायगावातील भ्रष्टाचारावर आमदार राजेश पवारांची ‘गांधीगिरी’ की ‘राजकीय नाट्यगिरी

आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाहणीत पितळ पडले उघडे, ठाण्यातील तीन आरोग्य मंदिरे बंदच
3

आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाहणीत पितळ पडले उघडे, ठाण्यातील तीन आरोग्य मंदिरे बंदच

बसची आगाऊ तिकिट सेवेचे वाजले तीन-तेरा! ST महामंडळाच्या ऑनलाईन व्यवस्थेमुळे प्रवाशांचे तीन तास गेले वाया
4

बसची आगाऊ तिकिट सेवेचे वाजले तीन-तेरा! ST महामंडळाच्या ऑनलाईन व्यवस्थेमुळे प्रवाशांचे तीन तास गेले वाया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.