परंपरा आणि प्रगतीचा संगम! लंडनकर झाला वैजापूरचा जावई (Photo Credit - AI)
वैजापूर: आजच्या २१ व्या शतकात जिथे माणूस चंद्रावर वस्ती करण्याच्या योजना आखत आहे. तिथे नात्यांची परिभाषा आणि लग्न समारंभाची पद्धत बदलली नाही तर नवलच! तंत्रज्ञान आज केवळ आपली कामेच सोपी करत नाही, तर माणसा-माणसांमधील भौगोलिक अंतरही कमी करत आहे. याची प्रचीती नुकतीच वैजापूरकरांना येथे आली. वैजापूर ग्रामीण १ येथील एका उच्चशिक्षित तरुणीचा साखरपुडा थेट व्हिडिओ कॉलद्वारे लंडनमध्ये कार्यरत असलेल्या तरुणाशी पार पडला. परंपरा आणि प्रगतीचा हा सुंदर संगम पाहून उपस्थित सर्व नातेवाईकांनी टाळ्यांच्या गजरात या अनोख्या सोहळ्याचे स्वागत केले.
प्रेम, आपुलकी आणि नात्यासाठी कोणतेही अंतर मोठे नसते हे या साखरपुड्याने सिद्ध केले. वैजापूर शहरानजीकच्या ग्रामीण १ मधील फुलेवाडी येथील प्रगती गणेश गायकवाड (जी थी. टेक., इलेवटिकल इंजिनिअरिंग) पदवीधारक आहे, आणि लंडनमध्ये ‘अॅमेझॉन’ सारख्या प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेला आशुतोष शिवाजी पेंड (मुळ रा. नांदगाव शिंगवे, जि. अहिल्यानगर, हल्ली मु. पुणे) यांचा हा अनोखा साखरपुडा झाला.
सध्या आशुतेष कामामुळे लंडनमध्ये असल्याने, वेळ आणि दोन खंडांमधील मोठे अंतर लक्षात घेऊन दोन्ही कुटुंबांनी एक क्रांतिकारक निर्णय घेतला, त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून साखरपुड्यासारखा महत्वाचा विधी पार पाडण्याचे ठरवले. या निर्णयामुळे केवळ वेळेची बचत झाली नाही, तर हा सोहळा कायम स्मरणात राहील. असा एक डिजिटल अविष्कार ठरला. साखरपुडवाचा मुख्य समारंभ मुलीच्या घरी, फुलेवाडी (वैजापूर ग्रामीण १) येथे पारंपारिक पद्धतीने पार पडला.
सर्व नातेवाईक आणि मंडळी उपस्थित होती, पण नवरदेव मात्र हजारो मैल दूर लंडनमध्ये एका मोठ्या स्क्रीनवर उपस्थित होता. हा साखरपुडा खास ठरला, कारण यावेळी केवळ रिंग एक्सचेंज (अंगठी बदलणे) झाले नाही, तर वैजापूर तालुक्याचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनीही समारंभाला उपस्थिती लावली. त्यानी वेट व्हिडिओ कॉलद्वारे आशुतोषला प्रश्न विचारून साखरपुड्याची महत्त्वाची प्रथा पूर्ण केली आणि त्याला व प्रगतीला डिजिटल पद्धतीनेच उत्तुंग भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आमदारांच्या या सहभागामुळे या घटनेला एक वेगळी राजकीय आणि सामाजिक किनार लाभली. लंडनमध्ये असलेला आशुतोष एका मोठ्या सकोनवर सर्वांना दिसत होता. आशुतोषने ‘व्हिडिओ कॉल’ द्वारे आपला ‘होकार कळवताच, टाळ्यांचा कडकडाट झाला. हा क्षण खऱ्या अर्थाने डिजिटल मिलन होता. हा अनोखा साखरपुडा केवळ दोन व्यक्तींच्या आयुष्याचा नव्हे, तर भारतीय समाजाच्या आधुनिकतेकडे वाटचाल करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
पारंपरिक पद्धतीने वधू-वरांना समोरा समोर पाहणे आणि त्यांच्या उपस्थितीत विधी करणे, ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. पण या साखरपुड्याने दाखवून दिले की, आजच्या जागतिक नोकरी आणि स्थलांतराच्या युगात, आपण गरजेनुसार तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवू शकतो. या घटनेमुळे वैजापूरसह संपूर्ण परिसरामध्ये एक सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. “दोन जिवांना जोडणारा हा व्हिडिओ कॉल म्हणजे आधुनिक युगातील ‘डिजिटल सेतू’ आहे. असे मत अनेकांनी व्यक्त केले.
सर्वच क्षेत्रात डिजिटल क्रांती झाली. नातेसंबंधातही आत्ता डिजिटल क्रांती होत आहे. जिये वधू-वर समोर असल्याशिवाय एक सोहळा पार पडत नसे, परंतु डिजिटल क्रांतीने या दोहोंतील अंतर कमी केले आहे. विशेष महणजे रुची परंपरा काही असो. अशा अन्नवेख्या पद्धतीने केलेल्या सोहळ्यामुळे संस्कृती, रुढी-परंपरा शाबूत राहून सगळ्यांचीच मने सांभाळली गेली.






