Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: शेंडी येथील वनविभागच्या टोलनाक्यावर आदिवासींचे रास्ता रोको आंदोलन

आदिवासींऐवजी बिल्डराचेच पुनर्वसन होत असल्याने शेंडी येथील वनविभागच्या टोलनाक्यावर आदिवासींचे रास्ता रोको आंदोलन केले.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 04, 2025 | 07:20 PM
शेंडी येथील वनविभागच्या टोलनाक्यावर आदिवासींचे रास्ता रोको आंदोलन

शेंडी येथील वनविभागच्या टोलनाक्यावर आदिवासींचे रास्ता रोको आंदोलन

Follow Us
Close
Follow Us:
  • भंडारदरा धरण परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांचा शासनावर गंभीर आरोप
  • शेंडी येथील वनविभागच्या टोलनाक्यावर आदिवासींचे रास्ता रोको आंदोलन
  • विविध मागण्या लेखी स्वरूपात सादर
भंडारदरा धरण परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी शासनावर गंभीर आरोप करत सांगितले की, “पुनर्वसन न मिळालेल्या आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडवण्याऐवजी शासन हे बिल्डरांचे पुनर्वसन करीत आहे.” नवगाव डांगाण परिसरात बिल्डरांकडून वर्ग–२ च्या जमिनींच्या खरेदी व्यवहारात गंभीर अनियमितता असल्याचा आरोप करत या खरेदीची तात्काळ चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

अकोले तालुक्यातील साम्रद, रतनवाडी, घाटघर, पांजरे, उडदावणे, मुरशेत, कोलटेंभे, शेंडी व भंडारदरा या गावांतील आदिवासी शेतकऱ्यांनी शेंडी येथील वनविभागाच्या टोलनाक्यावर रास्ता रोको करून आपली नाराजी व्यक्त केली. “वर्ग–२ च्या जमिनी बिल्डरांकडे कशा प्रकारे गेल्या? कोणत्या नियमांच्या आधारे खरेदी झाल्या?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Elphinstone Bridge: १५ तासांचा ब्लॉक…! ४० एक्सप्रेस आणि १,२५० लोकल गाड्यांवर परिणाम? मध्य रेल्वेची होणार कोंडी?

पुनर्वसन न मिळालेल्या आदिवासींची व्यथा

इंग्रजांच्या काळात ‘पुनर्वसन’ हा कायदा अस्तित्वात नसल्याने भंडारदरा धरणामुळे जमिनी गेलेल्या आदिवासी शेतकऱ्यांचे पुनर्वसन कधीच झाले नाही. 1960 नंतर त्यांना कसण्यासाठी काही जमीन देण्यात आली; मात्र त्या जमिनी वर्ग–२ या श्रेणीत नोंदवल्या गेल्याने 7/12 वर 100 टक्के पोटखराबा नोंद आहे. त्यामुळे अनेक वर्षे शेती करत असूनही या शेतकऱ्यांना ना पीक विमा मिळतो, ना नुकसानभरपाई.

संगमनेरचे तत्कालीन प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी या जमिनी वर्ग–१ मध्ये रूपांतरित कराव्यात, असे आदेश दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पंचनामेही केले होते.

आंदोलनादरम्यान मांडलेल्या मागण्या

आंदोलनकर्त्यांनी वनविभागाकडे काही प्रमुख मागण्या लेखी स्वरूपात सादर केल्या. त्या संदर्भात वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावीत यांनी सकारात्मक चर्चा केली. मात्र महसूल विभागाकडून योग्य माहिती न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली.

Leopard News: किंचित दिलासा! पुणे जिल्ह्यात वनविभागाची मोठी कारवाई; पहाटेच्या वेळेस 3 बिबट्यांना…

या आंदोलनासाठी राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बिल्डरांकडून जमिनी खरेदीचे संशयास्पद व्यवहार

आदिवासी भागातील सर्वच जमिनी वर्ग–२ मध्ये मोडत असून, अशा परिस्थितीत बिल्डरांकडून मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केली जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. “वर्ग–२ असताना या जमिनी खरेदी करण्याची कायदेशीर परवानगी बिल्डरांना कशी मिळाली?” याची तात्काळ चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी टोलनाक्यावर धरणे आंदोलन करत काही काळ वाहतूक रोखून धरली.

Web Title: Ahilyanagar news tribal farmers of bhandardara dam protest at shendi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Farmers Protest

संबंधित बातम्या

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
1

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार
2

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार

Shanishingnapur : शनि जयंतीला पोलीस प्रशासनाचे कौतुकास्पद नियोजन; शनिभक्तांकडून कौतुकाचा वर्षाव
3

Shanishingnapur : शनि जयंतीला पोलीस प्रशासनाचे कौतुकास्पद नियोजन; शनिभक्तांकडून कौतुकाचा वर्षाव

Ahilyanagar News : हाय गर्मी… तापमानाचा पारा चढला! थंडावा मिळवण्यासाठी कुत्र्यांनी शोधला अनोखा ‘थंडगार’ निवारा
4

Ahilyanagar News : हाय गर्मी… तापमानाचा पारा चढला! थंडावा मिळवण्यासाठी कुत्र्यांनी शोधला अनोखा ‘थंडगार’ निवारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.