Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: बिबटाच्या हल्ल्याचा अजून एक शिकार! महिलेला गमवावा लागला जीव

अहिल्यानगरमधील कोपरगावात बिबट्याने हल्ला केल्याच्या 2 घटना घडल्या. यातील एक घटनेत एका महिलेला जीव गमवावा लागला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 11, 2025 | 07:32 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • कोपरगावात बिबट्याचा धुमाकूळ
  • कोपरगावात बिबट्याने हल्ला केल्याच्या 2 घटना घडल्या
  • यातील एक घटनेत एका महिलेला जीव गमवावा तर दुसऱ्या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही
अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यात बिबट्याने दोन स्वतंत्र हल्ल्यांत एकाचा मृत्यू, एक महिला थोडक्यात बचावली. कोपरगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या दोन घटना घडल्या. येसगाव येथे झालेल्या हल्ल्यात शांताबाई अहिलाजी निकोले (रा. येसगाव) यांचा मृत्यू झाला, तर सुरेगाव येथे एका महिलेला ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे जीव वाचवता आला. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

येसगावमधील घटना सकाळी भाकरे वस्ती परिसरात घडली. शेतात चारा कापत असताना बिबट्याने अचानक शांताबाई निकोले यांच्यावर झडप घातली. हल्ला अत्यंत जोरदार आणि अनपेक्षित असल्याने त्यांना पळण्याची किंवा मदतीसाठी हाक मारण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

“जे पक्षाला सोडतात, ते निवडून येत नसतात!’ महायुतीबाबत निर्णय न झाल्याने मंत्री नरहरी झिरवाळांचे कार्यकर्त्यांना आवाहन

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ संतप्त झाले. नगर–मनमाड महामार्गावरील भास्कर वस्तीजवळ मोठा जमाव जमून रस्तारोको आंदोलन करण्यात आले. जमावाकडून वन विभागाच्या अकार्यक्षमतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

तर दुसरी घटना सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत घडली. अनिल वाबळे यांच्या शेतात कापूस वेचत असलेल्या महिलेकडे बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला. मात्र सोबतच्या महिलांच्या आरडाओरडीनंतर बिबट्या पळून गेला आणि ती महिला बचावली.

चार दिवसांपूर्वीच टाकळी शिवारात उसतोड मजुराच्या तीन वर्षीय मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर सलग तीन गंभीर घटना घडल्याने तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे.

Kolhapur News : स्थानिक आघाड्यांमुळे गुंतागुंत; कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिकेसाठी सत्ताधारी-विरोधकांची जय्यत तयारी

नरभक्षक बिबट्या ठार मारण्यास मंजुरी

या घटनांनंतर आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी संपर्क साधून नरभक्षक बिबट्या पकडून ठार मारण्याची मागणी केली. मंत्रालयातून मंजुरी मिळताच संगमनेर, राहुरी आणि कोपरगाव येथील वनविभागाच्या पथकांनी घटनास्थळी छावणी केली आहे.

आमदार काळे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची भेट

दोन्ही जनप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. परिसर तातडीने ‘बिबट्या प्रभावित क्षेत्र’ घोषित करावे, पिंजरे लावावेत आणि सतत गस्त घालावी, अशी मागणी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Web Title: Ahilyanagar news two incidents of leopard attack in kopargaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 07:32 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Leopard Attack

संबंधित बातम्या

NEET Paper Leak Update : नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यात मोठी कारवाई; ब्युटी पार्लर चालक महिलेला ताब्यात
1

NEET Paper Leak Update : नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यात मोठी कारवाई; ब्युटी पार्लर चालक महिलेला ताब्यात

Leopard Captured : मर्सिडीज-बेंझ कंपनीतील बिबट्या अखेर जेरबंद; थरारक मोहिमेनंतर वन विभागाला यश
2

Leopard Captured : मर्सिडीज-बेंझ कंपनीतील बिबट्या अखेर जेरबंद; थरारक मोहिमेनंतर वन विभागाला यश

Ahilyanagar : शेकडो वारकऱ्यांचे ‘टाळ-मृदुंग’ आंदोलन; लवांडेंना अटकेचा इशारा
3

Ahilyanagar : शेकडो वारकऱ्यांचे ‘टाळ-मृदुंग’ आंदोलन; लवांडेंना अटकेचा इशारा

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!
4

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.